शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील युवक म्हणतात, मराठी शिकुन नोकऱ्या मिळत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 15:42 IST

नाशिक : महाविद्यालयीन युवकांना मातृभाषेचा अभिमान असला तरी अभिजात मराठी ही संकल्पनाच माहिती नाही. मराठी बोलीभाषेत इंग्रजी आणि अन्य शब्दांचा वापर वाढल्याने मराठीची विटंबना होत आहे, असे मानणाºया युवक वर्गातील ६८ टक्के विद्यार्थ्यांनी भाषा सक्तीवर भर दिला आहे. एचपीटी कला आणि आरवायके विज्ञान महाविद्यालयातील पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात हे निष्कर्ष आढळले आहेत. विशेष म्हणजे मराठी शिकुन नोक-या मिळत नाही असे मतही सर्वेक्षणात युवकांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे सर्वेक्षणात निष्कर्ष आढळले अभिजात दर्जा बाबत अनभिज्ञमराठी सक्ती करण्याची ६८ टक्के युवकांची सूचना

नाशिक : महाविद्यालयीन युवकांना मातृभाषेचा अभिमान असला तरी अभिजात मराठी ही संकल्पनाच माहिती नाही. मराठी बोलीभाषेत इंग्रजी आणि अन्य शब्दांचा वापर वाढल्याने मराठीची विटंबना होत आहे, असे मानणाºया युवक वर्गातील ६८ टक्के विद्यार्थ्यांनी भाषा सक्तीवर भर दिला आहे. एचपीटी कला आणि आरवायके विज्ञान महाविद्यालयातील पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात हे निष्कर्ष आढळले आहेत. विशेष म्हणजे मराठी शिकुन नोक-या मिळत नाही असे मतही सर्वेक्षणात युवकांनी व्यक्त केले आहे.

महाविद्यालयाच्या शिक्षणक्रमातील दुसºया वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘मराठी तरुणांकडून मातृभाषेचा वापर’ या विषयावर विभाग प्रमुख आणि उपप्राचार्या डॉ. वृंदा भार्गेवे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरात सर्वेक्षण केले.

मराठी भाषेला अभिजात म्हणून दर्जा मिळाला तर नेमके काय फायदे होतील हे सर्वेक्षणातील ७४ टक्के युवकांना माहिती नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठीचे निकष युवकांना माहिती नाही, त्यामुळे मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यास संवादासाठी मराठीचा वापर वाढेल जागतिक स्तरावर मान्यता मिळेल, ती व्यवहार भाषा होऊ शकेल असे अनेक गैरसमज या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. मराठीचे शिक्षण घेऊन नोकरी मिळत नाही, असे मत व्यक्त करण्यात आले खरे; परंतु मराठी राजभाषाच नव्हे तर ज्ञानभाषा झाली पाहिजे, असे मतही युवा वर्गाने व्यक्त केले.मातृभाषा मराठी असल्याचा अभिमान ९८ टक्के तरुणांना आहे. सर्वेक्षणातील ७४ टक्के युवकांनी याबाबत अनभिज्ञता दर्शविली आहे. इतर भाषांच्या तुलनेत मराठी अवघड असल्याचे ४९ टक्के तरुणांचे मत असले तरी पदवीस्तरावर मराठी विषय घेणाऱ्यांची संख्या घटल्याचे ७६ टक्के युवकांनी मान्य केले आहे.

मातृभाषेत हिंदी आणि इंग्रजी भाषांतील शब्दांचा वापर वाढल्याचे ८४ टक्के युवकांचे मत आहे. तसेच चित्रपट आणि मालिकेतील बोलीभाषेचा परिणाम मातृभाषेवर होतो, असे ८८ टक्के युवकांनी सांगितले. सध्या अनेक मालिकांमधील चालतय की, बोलतोय की, चालेल की, असे शब्द वापरले जातात. याशिवाय सोशल मीडियावरील मराठीदेखील प्रमाण भाषा बिघडविण्यास कारण असल्याचे मत ५३ टक्के युवकांनी व्यक्त केले. मराठी भाषेत अश्लील शब्दांचा वापर होत असल्याचे ८५ टक्के मत आढळले. यावरून युवकांच्या म्हणजेच भावीपिढीतील मातृभाषेच्या पालनपोषणासाठी ही धोक्याच घंटा असल्याचेदेखील या कौलातून स्पष्ट झाले. 

टॅग्स :NashikनाशिकmarathiमराठीStudentविद्यार्थी