गवळी समाजाच्या तरुणांनी घेतली लिंग दीक्षा, गुरु उपदेश

By Admin | Updated: May 7, 2014 21:25 IST2014-05-07T20:35:33+5:302014-05-07T21:25:01+5:30

न्यायडोंगरी : न्यायडोंगरी परिसरातील गवळी समाजाच्या वतीने येथे लिंग दीक्षा व गुरुरउपदेश समारंभ धार्मिक वातावरणात पार पडला.

Young people of Gawli community took initiation of gender initiation, guru preached | गवळी समाजाच्या तरुणांनी घेतली लिंग दीक्षा, गुरु उपदेश

गवळी समाजाच्या तरुणांनी घेतली लिंग दीक्षा, गुरु उपदेश

न्यायडोंगरी : न्यायडोंगरी परिसरातील गवळी समाजाच्या वतीने येथे लिंग दीक्षा व गुरुरउपदेश समारंभ धार्मिक वातावरणात पार पडला. गेल्या अनेक वर्षानंतर या परिसरात घेण्यात आलेल्या या समारंभात नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद व मालेगाव आदि जिल्‘ातील गवळी समाज बांधवांनी सहभाग घेत सुमारे १००० तरुणांनी लिंग दीक्षा घेतली व गुरुउपदेश श्रवण केला. अत्यंत शिस्त बद्ध पद्धतीने पार पडलेल्या या समारंभाचे सांगता महा प्रसादाने करण्यात आली.
श्री गुरु तपोरान प्रभु पंडितायारध्य शिवाचार्य महाराज संस्थान मठ माजलगाव (जिल्हा बीड) यांनी संस्थेच्या वतीने शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते लिंग दिक्षा व गुरुउपदेश देऊन सर्व दिक्षार्थीचे गळ्यात शिव लिंग बांधण्यात आले. या कार्यक्रमाचे जयमान पद न्यायोंगरी येथील गवळी समाजाच्या तरुणांनी स्वीकारले.

Web Title: Young people of Gawli community took initiation of gender initiation, guru preached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.