तिसगाव धरणात युवकाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 23:47 IST2020-03-16T22:29:05+5:302020-03-16T23:47:26+5:30
वणी : खेडगाव रस्त्यावरील तिसगाव धरणात युवकाचा मृतदेह सापडला आहे. तुषार अशोक बागुल असे त्याचे नाव आहे. तिसगाव येथील रहिवासी तुषार बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती. शोधाशोध करूनही त्याचा पत्ता लागला नव्हता. अखेर तिसगाव धरणाच्या गेटलगत त्याचा मृतदेह आढळून आला.

तिसगाव धरणात युवकाचा मृतदेह
ठळक मुद्देउन्हाळ्यात येथे पोहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : खेडगाव रस्त्यावरील तिसगाव धरणात युवकाचा मृतदेह सापडला आहे. तुषार अशोक बागुल असे त्याचे नाव आहे.
तिसगाव येथील रहिवासी तुषार बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती. शोधाशोध करूनही त्याचा पत्ता लागला नव्हता. अखेर तिसगाव धरणाच्या गेटलगत त्याचा मृतदेह आढळून आला.
ओळख पटल्यानंतर सोमवारी वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तिसगाव धरणाप्रमाणेच ओझरखेड धरणाचेही मोठे पात्र असल्याने उन्हाळ्यात येथे पोहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.