ओझरखेड धरणात तरुणाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 00:44 IST2021-10-18T00:43:37+5:302021-10-18T00:44:25+5:30
वणी : काही दिवसांपूर्वी घरातून निघून गेलेल्या दिंडोरी तालुक्यातील दगडपिंप्रीच्या युवकाचा मृतदेह ओघरखेड घरणात तरंगताना आढळून आला. धरणाच्या पश्चिम ...

ओझरखेड धरणात तरुणाचा मृतदेह
वणी : काही दिवसांपूर्वी घरातून निघून गेलेल्या दिंडोरी तालुक्यातील दगडपिंप्रीच्या युवकाचा मृतदेह ओघरखेड घरणात तरंगताना आढळून आला. धरणाच्या पश्चिम बाजुला शनिवारी (दि.१६) सकाळी ८.३० च्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगताना ओझरखेडच्या नागरिकांना दिसला असता सरपंच गंगाधर निखाडे यांना कळविण्यात आले. त्यांनी तत्काळ वणी पोलिसांशी संपर्क करून याबाबत माहीती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून ग्रामस्थांच्या मदतीने धरणाच्या पाण्यात तरंगत असलेला मृतदेह बाहेर काढला.
हा मृतदेह रवींद्र हौशिराम चौधरी (२२) याचा असल्याचे व तो गेल्या चार-पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समजले. त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह ओळखला.
शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास वणी पोलीस करीत आहेत.