शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

साठीतला युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 12:57 IST

सिंगापूर मास्टर्स ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्ड असोसिएशन चॅम्पियनशिप या आंतरराष्टÑीय स्पर्धेत तानाजी सखाराम भोर (६२) यांनी सहभाग घेऊन भारताचे प्रतिनिधित्व केले.

शरदचंद्र खैरनार

सिंगापूर मास्टर्स ट्रॅक अ‍ॅण्ड फिल्ड असोसिएशन चॅम्पियनशिप या आंतरराष्टÑीय स्पर्धेत तानाजी सखाराम भोर (६२) यांनी सहभाग घेऊन भारताचे प्रतिनिधित्व केले. बीबी नं. एम-६६०७ या स्पर्धेत ४०० मीटर रनिंगमध्ये सिल्व्हर, ८०० मीटरमध्ये सिल्व्हर, ४ बाय ४०० रिले रनिंगमध्ये ब्रॉँझ मेडल असे एकूण ३ मेडल भारतासाठी मिळविले. या स्पर्धेत जपान, आॅस्ट्रेलिया, ब्रुनी, इंडोनेशिया, हॉँगकॉँग, मलेशिया, सिंगापूर, अमेरिका, चीन, भूतान हे ११ देश सहभागी झाले होते. या स्पर्धा ६, ७ जुलै २०१९ रोजी कलिंगा स्टेडियम सिंगापूर येथे झाल्या. एकलहरे येथील नाशिक औष्णिक वीज केंद्रात ३८ वर्षे सेवा केल्यावर ३० जून २०१६ रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर काय करावे, वेळ कसा जाईल याचीच चिंता अनेकांना असते. मात्र तानाजी भोर याला अपवाद ठरले.सेवानिवृत्तीनंतर त्यांनी रनिंगला सुरुवात केली. तत्पूर्वी नोकरीत असताना त्यांना पोहण्याचा छंद होता. रोज सकाळी नाशिकरोड येथील महापालिकेच्या तरणतलावात ५ ते ७ दोन तास पोहण्याचा सराव करून ते सकाळी ८ वाजता एकलहरे येथे ड्यूटीवर येत. पोहण्याचे सातत्य त्यांनी त्यांच्या ४६व्या वर्षापासून सुरू ठेवले. उन्हाळ्याच्या सुटीत पोहणाऱ्यांची गर्दी होत असल्याने नवोदितांना शिकविण्यासाठी कोच म्हणून त्यांनी सुरुवात केली. पोहण्याच्या सरावामुळे त्यांची बॉडी फीट राहिली.सेवानिृत्तीनंतर त्यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी रनिंगला सुरुवात केली. नोकरीचे टेन्शन नसल्याने त्यांनी पूर्णवेळ रनिंगसाठी दिला. यासाठी त्यांना केरळचे के.पी. कोशी कोच म्हणून लाभले.सेवानिवृत्तीनंतर तीन वर्षांतच त्यांनी ६० प्लसमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारून अनेक पारितोषिके मिळविली. तरुणांनाही लाजवेल अशी ही कामगिरी आहे.भोर यांनी सेवानिवृत्तीपासून (२०१६) आतापर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये धावपटू म्हणून सहभाग घेतला. त्यांना जिल्हास्तरीय १०, विशेष नैपुण्य २, राज्यस्तरीय रौप्यपदक १, सुवर्णपदक १, राष्ट्रीय कांस्यपदक १, रौप्यपदक १, सुवर्णपदके २ व गेल्याच महिन्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन दोन सिल्व्हर, तर एक ब्राँझ मेडल भारतासाठी मिळविले.भोर यांनी आतापर्यंत राष्ट्रीय स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन अनेक पदके व प्रमाणपत्रे मिळविली आहेत.२६ व २७ नोव्हेंबर २०१६ला कर्नाटकातील बंगळुरू येथील पंजगावला स्पर्धा झाली. बीबी नं. ५५१० भोर यांची ही पहिली स्पर्धा असल्याने ४ व ५ वा नंबर आला. सहभाग प्रमाणपत्र मिळाले.नाशिक पोलीस मॅरेथॉन १२ फेब्रुवारी २०१७ स्पर्धेत सहभाग घेऊन ३ किमी रनिंग ६० वर्षांवरील वयोगटात (पुरुष) दुसरा क्रमांक मिळवला.३७वी राष्ट्रीय मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २४ ते २६ मार्च २०१७, नाशिक जिल्हा मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स आयोजित स्पर्धेत ४ बाय ४०० = १६०० रिले स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून रौप्यपदक व प्रमाणपत्र मिळाले. वेळ ४.५.०९ सेकंद. महाराष्ट्र राज्य मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स आयोजित मुंबई विद्यापीठ स्पोर्ट्स पॅव्हेलियन मरिन लाईन्स मुंबई येथे १९ नोव्हेंबर २०१७ रोजी झालेल्या स्पर्धेत ३००० मीटर्स स्पर्धेत रौप्यपदक (वेळ १४.२७.०१ सेकंद). ८०० मीटर्स धावणे- सुवर्णपदक- वेळ ३.८.४ सेकंद. नाशिक शहर पोलीस दलातर्फे गेल्या १८ फेब्रुवारी रोजी नाशिक मॅरेथान वाहतूक सुरक्षितता व सामाजिक सलोखा या ब्रीदवाक्यावर स्पर्धा आयोजित केली होती. त्यात ३ कि.मी. धावणे स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळवत पाच हजारांचे पारितोषिक मेडल व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. भोर हे सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील असल्याने खेळाची कुठलीही पार्श्वभूमी त्यांना नव्हती. मात्र जिद्द, चिकाटी आणि सततचा सराव या जोरावर त्यांनी सेवानिवृत्तीनंतरही आंतरराष्टÑीय स्पर्धेपर्यंत मजल मारली.

टॅग्स :Nashikनाशिक