मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 17:09 IST2021-05-29T17:09:31+5:302021-05-29T17:09:58+5:30
त्र्यंबकेश्वर : मासेमारीसाठी गेलेल्या तालुक्यातील पांगुळघर येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
ठळक मुद्देहरसूल पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
त्र्यंबकेश्वर : मासेमारीसाठी गेलेल्या तालुक्यातील पांगुळघर येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाला.
चंद्रकांत काशीनाथ खिंडारे (२६) असे मृताचे नाव आहे. तो खरशेत जवळील दमणगंगा नदीच्या डोहात गळाद्वारे मासेमारी करताना दगड सटकल्याने पाण्यात पडला व बुडून मृत झाला. याबाबतची माहिती धोंडीराम पांडुरंग दळवी यांंनी दिल्याने हरसूल पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. बी. तुंगार करीत आहेत.