दुभाजकावर दुचाकी आदळून तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:38 IST2020-06-17T22:52:07+5:302020-06-18T00:38:55+5:30
पंचवटी : पेठरोड येथील तीन पुतळा रस्त्यावरील दुभाजकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात १८ वर्षीय युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुभाजकावर दुचाकी आदळून तरुण ठार
पंचवटी : पेठरोड येथील तीन पुतळा रस्त्यावरील दुभाजकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात १८ वर्षीय युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघात सोमवारी (दि.१५) घडला.
सुनील बाळू सावंत (१८, रा. भराडवाडी) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. सावंत व त्याचा चुलत भाऊ सचिन सावंत असे दोघेजण दुचाकीवरून पेठरोड आरटीओकडून फुलेनगरकडे जात होते. दुचाकी दुभाजकावर धडकली. यात सुनील जखमी गंभीर जखमी झाला. घरी गेल्यावर उलट्या व त्रास जाणवू लागल्याने वडिलांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले. अधिक तपास हवालदार अरुण गायकवाड करीत आहेत.
-----------------------
किरकोळ कारणावरून चौघांची एकास मारहाण
नाशिकरोड येथील मालधक्का रोड गौतम छात्रालयामागे किरकोळ कारणावरून भीमा रतन वानखेडे या युवकास मारहाण करणाऱ्या संशयित चार जणांविरु द्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानखेडे यांच्या घराचे काम सुरू होते. किशोर जाधव यास वानखेडेने माती घेऊन जाण्यास मनाई केली. याचा राग मनात धरून जाधवने ध्यायचंद शिरसाठ, राकेश माने, विशाल माने यांना बोलावून वानखेडे यास मारहाण केली.