मन्याड धरणात मालेगावचा तरुण बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 01:02 IST2021-09-18T01:01:21+5:302021-09-18T01:02:48+5:30
नांदगाव तालुक्यातील मन्याड धरणात पोहोण्यासाठी गेलेल्या मालेगाव येथील तरुण बुडाला असून, त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, तरुणासोबत आणखी दोघे जण होते. ते बचावले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मन्याड धरणात मालेगावचा तरुण बुडाला
नांदगाव : तालुक्यातील मन्याड धरणात पोहोण्यासाठी गेलेल्या मालेगाव येथील तरुण बुडाला असून, त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, तरुणासोबत आणखी दोघे जण होते. ते बचावले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मालेगाव येथील तीन तरुण मन्याड धरणावर पर्यटनासाठी गेले होते. सध्या मन्याड धरणात जलसाठा वाढला आहे. त्यामुळे तेथे पर्यटकांची गर्दी होत आहे. मालेगाव हे तीन तरुण धरणावर गेले असता त्यांना पोहोण्याचा मोह आवरला नाही. त्यात एकाला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला तर अन्य दोघे बचावले. तरुणाचा शोध घेतला जात आहे.