कबुतर पकडताना तोल जाऊन युवक मृत्यूमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 02:36 PM2020-07-11T14:36:58+5:302020-07-11T14:37:44+5:30

डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.

A young man dies while catching a pigeon | कबुतर पकडताना तोल जाऊन युवक मृत्यूमुखी

संग्रहित छायाचित्र

Next

नाशिक : रामवाडी परिसरातील सार्वजनिक शौचालयाच्या गच्चीवर जाऊन गुरूवारी (दि.९) रामसिंग मंगलसिंग परदेशी (२८,रा.रामवाडी) हा युवक कबुतर पकडण्यासाठी गेला होता. यावेळी सायंकाळच्या सुमारास त्याचा गच्चीवरून खाली तोल गेल्याने परदेशी कोसळला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.

दुचाकीच्या धडकेत चालक ठार
नाशिक : जुना जकात नाका येथून दुचाकीवरु न आडगावमार्गे ओझरच्या दिशेने जाताना समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने सैयद अली सैयद (४८, रा. आडगाव) या दुचाकीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरु वारी (दि.९) घडली. सय्यद हे त्यांच्या दुचाकीने ओझरकडे जात होते. यावेळी समोरून भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत ते रस्त्यावर कोसळले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

 

Web Title: A young man dies while catching a pigeon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.