तरुणाचा वीजेचा झटका लागून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 16:36 IST2021-05-17T16:35:46+5:302021-05-17T16:36:14+5:30
चांदवड :तालुक्यातील नांदुरटेक येथील २३ वर्षीय तरुणाचा इलेक्ट्रीक खांबाच्या तारेत विद्युत प्रवाह उतरल्याने झटका बसून जागीच मृत्यू झाला आहे.

तरुणाचा वीजेचा झटका लागून मृत्यू
चांदवड :तालुक्यातील नांदुरटेक येथील २३ वर्षीय तरुणाचा इलेक्ट्रीक खांबाच्या तारेत विद्युत प्रवाह उतरल्याने झटका बसून जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत दीपक साहेबराव शिंदे याने चांदवड पोलीस स्टेशनला खबर दिली. सोमवारी (दि.१७) सकाळी नांदुरटेक येथील किशोर निवृत्ती मोरे यास घराचे बाहेर उभा असतांना इलेक्ट्रीक खांबाला ताण दिलेल्या तारेचा झटका बसुन तो मरण पावला. त्यास चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत म्हणून घोषीत केले. याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बापु चव्हाण हे करीत आहेत.