बंधाऱ्यात पाय घसरून तरूणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 16:04 IST2020-04-04T16:03:53+5:302020-04-04T16:04:12+5:30
पिळकोस : कळवण तालुक्यातील नवी बेज येथील गावालगत असलेल्या सिडको वस्तीतील आदिवासी तरु णाचा गिरणा नदीवरील बंधाºयात पाण्यात पाय घसरून बुडून मृत्यू झाला.

बंधाऱ्यात पाय घसरून तरूणाचा मृत्यू
पिळकोस : कळवण तालुक्यातील नवी बेज येथील गावालगत असलेल्या सिडको वस्तीतील आदिवासी तरु णाचा गिरणा नदीवरील बंधाºयात पाण्यात पाय घसरून बुडून मृत्यू झाला. नवी बेज येथील काळू हिरामण गांगुर्डे (३०) याचा बंधाºयात पाय घसरला व तो पाण्यात पडला. काही समजायच्या आतच तो खोल पाण्यात बुडाला. गिरणा नदीवरील हा ब्रिटीश कालीन बंधारा अतिशय खोल आहे. सदर घटना तेथील मासेमारी करणाºया आदिवासी बांधवांना कळतात त्यांची एकच धावपळ उडाली. परंतु तो पाण्यातून वर येत नसल्याने वस्तीवर व गावात ही घटना समजताच ग्रामस्थ व पट्टीचे पोहणारे आदिवाशी युवकांनी बंधा-याकडे धाव घेतली. आदिवाशी वस्तीतील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी काल अंधार पडेपर्यंत पाण्यात त्याचा शोध घेतला परंतु अंधार पडल्याने शोधकार्य थांबले गेले. दुसºया दिवशी सकाळी त्या तरूणाचा मृतदेह बाहेर काढला. कळवण पोलीस स्टेशनला याबाबतीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कोशारे करीत आहे . काळू गांगुर्डे यांच्या पश्यात आई ,वडील ,भाऊ असा परिवार आहे.