ओझर : येथे नारखेडे चाळीत राहणाऱ्या अभिषेक मच्छिंद्र निकम या सतरावर्षीय तरुणाने रविवारी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अभिषेक याचे वडील नोकरीस गेले होते, तर आई माहेरी गेली होती. रात्री ९ वाजेच्या सुमारास वडील मच्छिंद्र निकम हे कामावरून घरी आले असता त्यांनी दार ठोठावले असता आतमधून कुणीही दार उघडले नाही. पाठीमागील बाजूस जाऊन दार उघडले असता अभिषेक याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. मयत अभिषेक हा एकुलता एक असल्याने व स्वभावानेदेखील शांत असल्याने चाळीतील नागरिकांनी एकच हंबरडा फोडला. रात्री पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पुढील तपास ओझर पोलीस करीत आहे.भरवस्तीत झालेल्या या आत्महत्येच्या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.
ओझर येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 01:47 IST