शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
3
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
7
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
8
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
9
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
10
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
11
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
12
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
13
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
14
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
15
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
18
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
19
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
20
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश

वडिलांच्या कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:46 IST

एकत्रित कुटुंबातील वयोवृद्ध वडिलांच्या कर्जाला कंटाळून दहीवड (ता. देवळा) येथील तरु ण शेतकºयाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

खर्डे : एकत्रित कुटुंबातील वयोवृद्ध वडिलांच्या कर्जाला कंटाळून दहीवड (ता. देवळा) येथील तरु ण शेतकºयाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत मालेगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दहीवड येथील शरद त्रंबक अहिरराव हा तरु ण शेतकरी आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांसह मतिमंद भाऊ व पत्नी, मुलगा व दोन मुलींसह शेती व्यवसाय करीत होता. वडीलांच्या नावावर देना बँकेचे साडेतीन लाख रु पयांचे कर्ज व डाळिंबाला मिळत असलेला कवडीमोल बाजारभाव यामुळे वैफल्यग्रस्त अवस्थेत असलेल्या शरद अहीरराव याने स्वत:च्या डाळिंबाच्या क्षेत्रात शनिवारी (दि.१७) रोजी सायंकाळच्या सुमारास विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.  त्याला तात्काळ कुटुंबीयांनी व जवळच्या नागरीकांच्या मदतीने मालेगाव येथे खाजगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र रविवारी ( दि. १८) रोजी रात्री उपचारादरम्यान शरद अहीरराव याचे निधन झाले. मयत शरद अहीरराव यांच्या नावावर दहीवड येथे शेतजमीन असून वडीलांच्या नावावर देवळा येथील देना बँकेच्या शाखेत साडेतीन लाख रु पयांचे कर्ज आहे.  दि. १५ फेब्रुवारी २०१५ पासून असलेल्या कर्जाची गेल्या दोन वर्षांपासून डाळिंबाला कवडीमोल भाव मिळत असल्याने परतफेड करता आली नव्हती. त्यामुळे वैफल्यग्रस्त अवस्थेत असलेल्या शरदने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शरद अहीरराव याच्या पाश्च्यात वयोवृद्ध आई -वडील , मतिमंद भाऊ, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. शरद अहीरराव यांच्यावर सोमवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान दहीवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान देवळा येथील महसूल विभागाचे मंडळ निरीक्षक बी. व्ही.अहीरराव, तलाठी के.पी. जयस्वाल यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.जायगाव शिवारात एकाची आत्महत्यानायगाव : सिन्नर तालुक्यातील वडझिरे (धाबे मळा ) येथील काळू चंद्रभान गायकवाड ( ४१ ) यांनी जायगाव शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. जायगाव शिवारात सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास येथील शेतकरी संतोष दिघोळे हे शेतात जात असतांना त्यांना मोठ्या पाझर तलाव परिसरातील गायरानातील गट.नंबर १९२ मधील सागाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दिसला. आजुबाजुच्या लोकांना सदर घटनेची खबर मिळताच वडझीरे येथील धाबेमळा येथील काळू गायकवाड यांचा असल्याचे समजले. जायगाव येथे नातेवाईकांकडे यात्रेसाठी आलेल्या पत्नीला भेटण्यासाठी ते रविवारी आले असल्याचे समजते. सदर घटनेची माहिती जायगावचे पोलीस पाटील भिकाजी गिते यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करत आकस्मीक मृत्यूची नोंद केली. सिन्नर येथील नगरपालिकेच्या दवाखान्यात शिवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. गायकवाड यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुलगे,एक मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या