खोपडी येथे सर्पदंशाने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:38 IST2019-10-05T00:37:41+5:302019-10-05T00:38:32+5:30
खोपडी येथे सर्पदंशाने तरुण शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दत्तात्रय हिरामण पवार (३५) असे मृत तरुण शेतकºयाचे नाव आहे.

खोपडी येथे सर्पदंशाने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
सिन्नर : तालुक्यातील खोपडी येथे सर्पदंशाने तरुण शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दत्तात्रय हिरामण पवार (३५) असे मृत तरुण शेतकºयाचे नाव आहे.
खंबाळे शिवारातील शेतात काम करीत असताना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दत्तात्रय पवार यांना सर्पदंश झाला होता. त्यांना उपचारासाठी नाशिक येथे घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.