शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

व्हिडिओ स्टेटस ठेवत युवा शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2022 23:03 IST

दिंडोरी : तालुक्यातील पाडे येथील युवा शेतकऱ्याने बँकेच्या कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली.

ठळक मुद्देदिंडोरी : बँकेच्या तगाद्याला कंटाळून घेतली टोकाची भूमिका

दिंडोरी : तालुक्यातील पाडे येथील युवा शेतकऱ्याने बँकेच्या कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली.पाडे शिवारातील सिग्राम कंपनीलगत शेत असलेल्या संदीप राजेंद्र भुसाळ (२४) या शेतकऱ्याने एका राष्ट्रीयीकृत बँकेकडून घेतलेल्या कर्ज वसुलीच्या तगाद्यामुळे आपल्या शेतालगत असलेल्या आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास निदर्शनास आली. या घटनेबाबत मयताचा मावसभाऊ ज्ञानेश्वर संजय शिंदे (रा. वलखेड) यांनी घटनेबाबत दिंडोरी पोलिसांना खबर दिली. त्यांनी असे सांगितले की, माझा मावस भाऊ संदीप राजेंद्र भुसाळ ( रा. पाडे) हा आपली आई, भाऊ व आजी यांच्यासोबत राहतो व शेती करतो. त्याने शेती व्यवसायासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेतले होते; परंतु गेल्या तीन वर्षांपासून कोरोना परिस्थिती व शेतीतील कमी उत्पन्नामुळे बँकेचे कर्ज भरू शकला नाही. बँकेने गेल्या सहा महिन्यापासून कर्ज वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात तगादा लावल्याने नैराश्यातून पाडे शिवारातील त्यांच्या राहत्या घराच्या मागील आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या मोबाइलमध्ये याबाबतचे स्टेटस ठेवले. आपण कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहोत. या घटनेप्रकरणी दिंडोरी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस करीत आहेत.पाडे येथील युवा शेतकरी आत्महत्या घटनेबाबतचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून, सविस्तर अहवाल लवकर तयार करून वरिष्ठ कार्यालयास पाठविला जाणार आहे.- पंकज पवार, तहसीलदार, दिंडोरी 

टॅग्स :FarmerशेतकरीPoliceपोलिस