शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी...', अजित पवार यांचं विधान
3
"कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
4
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
5
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
6
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
7
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
8
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
9
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
10
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
11
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
12
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
13
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
14
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
15
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
16
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
17
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
18
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
19
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
20
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

राह पर दौडना हैं, मंजिल का सोचा नही हैं : आरती पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:40 AM

मॅरेथॉन स्पर्धांमध्ये नाशिकच्या धावपटूंनी एक मैलाचा दगड रोवला आहे. देशांर्गत होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या नावाची पताका निर्विवाद झळकत राहिली आहे. तशी ती ठाणे मॅरेथॉनमध्येही फडकली.

मॅरेथॉन स्पर्धांमध्ये नाशिकच्या धावपटूंनी एक मैलाचा दगड रोवला आहे. देशांर्गत होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या नावाची पताका निर्विवाद झळकत राहिली आहे. तशी ती ठाणे मॅरेथॉनमध्येही फडकली. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या धावपटूंनी नेहमीच आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कविता राऊत हिने सुरू केलेला हा सिलसिला आजही सुरू आहे. ठाण्याच्या ट्रॅकवर कविताप्रमाणेच मोनिका, संजीवनी ,पूनम यांनी वर्चस्वाची परंपरा कायम राखली. या साखळीत आता आणखी एक नाव प्राधान्याने समोर आले असून, नुकतीच ही स्पर्धा जिंकलेली आरती पाटील हिच्याशी साधलेला संवाद...प्रश्न : ठाणे मॅरेथॉन तुझ्यासाठी नवीन नाही, यापूर्वीदेखील ही स्पर्धा जिंकलेली आहे. हा विजय तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे.पाटील : ठाणे मॅरेथॉन यापूर्वी मी २०१७ मध्ये जिंंकलेली आहे. त्यानंतरही अनेक मॅरेथॉनमध्ये नाशिकचे नाव उंचावता आले आहे. यश, अपयश हा खेळाचा एक भाग आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत एका मोठ्या विजयाची गरज होती. नाशिकसाठी आणि अन्य धावपटूंनादेखील बुस्ट मिळण्यासाठी हे गरजेचे होते. गेल्या काही महिन्यांपासून नाशिकच्या अ‍ॅथलेटिक्ससाठी मोठ्या विजयाची गरज होती. या विजयामुळे माझ्यासह सर्वांना ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे सर्वांसाठीच या विजयाचे जास्त कौतुक आहे.प्रश्न : तुझ्या खेळातील सातत्य आणि कामगिरी दिवसेंदिवस उंचावत आहे. तुझ्या कामगिरीकडे तू कसे बघते.पाटील : इयत्ता पाचवीपासून मी खेळायला सुरुवात केलेली आहे. आज दहा वर्षे पूर्ण झाली असून, मागे वळून पाहिले तर खूप मोठा पल्ला अजूनही गाठायचा असल्यामुळे मला अजून थांबायचे नाही. खूप काही करायचे आहे, मिळवायचे आहे. कविता, मोनिका, संजीवनी यांचा आदर्श आणि मार्गदर्शन असल्यामुळे तर आणखीनच उत्साह संचारतो. तरीही खूप मोठा असा विचार केलेला नाही. सध्या एव्हढेच समजते की ‘राह पर दौडना हैं, मंजिल का सोचा नही’, त्यामुळे लागलीच फार मोठे स्वप्न सांगता येणार नाही. परंतु आलेल्या प्रत्येक स्पर्धेचा सराव मात्र कसून करते.प्रश्न : सराव आणि शिक्षण याचा ताळमेळ तू कसा साधते? दिनचर्या कशी आहे?पाटील : सरावात सातत्य ठेवावेच लागते, प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांचे गुरूतुल्य मार्गदर्शन असल्यामुळे सरावाचे योग्य सूत्र साधत नियमित रोज सकाळी दोन तास सराव, त्यानंतर डायट, दुपारी कॉलेज, त्यानंतर दुपारी पूर्णपणे आराम आणि सायंकाळी पुन्हा दोन तास सराव. सरावानंतर अभ्यास असा रोजचा दिनक्रम आहे.मोठ्या स्पर्धांचा अनुभवआरती पाटील हिला मोठ्या स्पर्धांचादेखील अनुभव असून, तिने यापूर्वी ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धा २०१७ मध्येही जिंंकलेली आहे. खेळातील सातत्य, कठोर मेहनतीच्या जोरावर तिने स्पर्धा जिंकलेल्या आहेत. तिच्या नावावर अनेक विजय आहेत. परंतु अलीकडेच तिने इटली येथे झालेली वर्ल्ड युनिर्व्हसिटी आणि एशियन क्रॉस कन्ट्री स्पर्धेत मिळविलेले यश लक्षात राहणारे आहे.पाठीवरती हातनाशिकच्या मातीत आणि भोसलाच्या मैदानावर अनेक धावपटू घडले आणि त्यातून प्रेरणा घेऊन धावपटू अजूही घडत आहे. प्रशिक्षक विजेंद्रसिंग आणि भोसला तसेच महिंंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राच्या सहकार्याने धावपटूंना मिळणारे प्रेम, नाशिककरांच्या सदिच्छा नेहमीच बळ देऊन जातात.लक्ष्य आता सिनिअर इंटरस्टेटमॅरेथॉन स्पर्धेच्या विजयामुळे आत्मविश्वास नक्कीच वाढतो. यामुळे पुढील स्पर्धेची जोमाने तयारी करण्यास मदत होते. ठाणे मॅरेथॉन स्पर्धा जिंकल्यामुळे आता पुढच्या स्पर्धेच्या तयारीला ऊर्जा मिळाली आहे. आता लक्ष्य केवळ सिनिअर इंटरस्टेट स्पर्धेकडे असून, येत्या दि. २७ ते ३० आॅगस्ट या कालावधीत लखनऊ येथे या स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक