कॉँग्रेसकडून योगी सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:09 IST2019-07-19T23:09:43+5:302019-07-20T00:09:44+5:30
उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे झालेल्या हत्याकांडातील पीडितांची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशातील पोलिसांनी मिर्जापूर येथे अटक केल्याच्या निषेधार्थ शहर कॉँग्रेसच्या वतीने योगी सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. कॉँग्रेस भवनासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडेही मारले.

काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ कॉँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडेही मारले.
नाशिक : उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे झालेल्या हत्याकांडातील पीडितांची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशातील पोलिसांनी मिर्जापूर येथे अटक केल्याच्या निषेधार्थ शहर कॉँग्रेसच्या वतीने योगी सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
कॉँग्रेस भवनासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडेही मारले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन भारतीय जनता पार्टीची दडपशाही काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी कदापीही सहन करणार नाही, असा इशारा देण्यात आला.
यावेळी शहर अध्यक्ष शरद आहेर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित, युवक अध्यक्ष स्वप्नील पाटील, हनीफ बशीर, सुरेश मारू, नीलेश (बबलू) खैरे, कैलास कडलग, विजय पाटील, उद्धव पवार, डॉ. सूचेता बच्छाव, ज्युली डिसूझा, गोपाळशेठ जगताप, चारुशीला शिरोडे, माया काळे, रामकिसन चव्हाण, अरुण दोंदे, दर्शन पाटील, माणिक जायभावे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.