शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भारत योग यात्रा योगोत्सवात योगाभ्यासकांनी अनुभवली योगनिद्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 21:14 IST

देशातील पहिले योगविद्यापीठ अशी ख्याती असलेल्या बिहार स्कूल ऑफ योगाच्या भारत योग यात्रा योगोत्सवास शुक्रवारी (दि. ८) नाशिकमध्ये ठक्कर डोम येथे उत्साहात सुरुवात झाली. ‘स्वयम को जानो’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित योगोत्सवातील पहिल्याच सत्रात पाचशेहून अधिक साधकांनी सहभाग नोंदवत योगनिद्रा अनुभवली.

ठळक मुद्देनाशिकमध्ये भारत योग यात्र उत्सवास प्रारंभपाचशे योगासभ्यासकांनी अनुभवली योगनिद्रा

नाशिक : देशातील पहिले योगविद्यापीठ अशी ख्याती असलेल्या बिहार स्कूल ऑफ योगाच्या भारत योग यात्रा योगोत्सवास शुक्रवारी (दि. ८) नाशिकमध्ये ठक्कर डोम येथे उत्साहात सुरुवात झाली. ‘स्वयम को जानो’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित योगोत्सवातील पहिल्याच सत्रात पाचशेहून अधिक साधकांनी सहभाग नोंदवत योगनिद्रा अनुभवली.अनेक वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार या योग्यविद्येचा वापर कुठेही केल्याने उत्कृष्ट परतावे मिळत असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती स्वामी शिवानंद सरस्वती यांनी व्याख्यानातून दिली. सत्राच्या प्रारंभी आचार्य कैवल्यानंद सरस्वती यांनी मन:शांती तसेच वैविध्यपूर्ण आसनांची माहिती देऊन प्रात्यक्षिक ांचे सादरीकरण केले. ओमकारच्या विविध छटा त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितल्या. पवनमुक्तासनाचे तीन टप्प्यात अध्ययन करून मार्गदर्शन केले. पुढे गायत्री मंत्र म्हणत तितली आसन करत त्याचे फायदे समजावून सांगितले. प्राणायामचाही अभ्यास योगाभ्यासकांकडून करून घेण्यात आला. दरम्यान, पुढील दोन दिवस शनिवार आणि रविवारी सकाळी व संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ वाजेदरम्यान शास्त्रीय पध्दतीने योगासने, प्राणायाम, ‘स्वयम को जानो’ विषयावर प्रवचन आणि ध्यानसाधना असे कार्यक्रम होणार आहेत. 

असाध्य रोगांवर नियंत्रण शक्ययोगनिद्रेच्या प्रभावाने अनेक असाध्य आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे स्वामी शिवराजानंद सरस्वती यांनी सांगितले. तसेच मानसशास्रीय आजार, निद्रानाश, तणाव, नाश आणणाºया औषधांपासून मुक्ती मिळणे शक्य असून, सांधेदुखी, दमा, पेप्टिक अल्सर, कॅन्सर, हृदयरोग यासारख्या आजारांवरील संशोधनात योगनिद्रेपासून सकारात्मक परिणाम बघायला मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :YogaयोगNashikनाशिकHealthआरोग्य