ठाणे महापालिका अधिकाऱ्यांवर हल्ल्याचा येवल्यात कामगार सेनेकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST2021-09-02T04:29:59+5:302021-09-02T04:29:59+5:30
येवला : ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा येथील म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेने निषेध करून तहसीलदार व पालिका प्रशासनास ...

ठाणे महापालिका अधिकाऱ्यांवर हल्ल्याचा येवल्यात कामगार सेनेकडून निषेध
येवला : ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा येथील म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेने निषेध करून तहसीलदार व पालिका प्रशासनास निवेदन सादर केले आहे.
ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे या अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचे हातगाडी, फेरीवाले व अमरजित यादव यांनी त्यांच्यावर व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला केला. यात हे दोघेही गंभीर जखमी झाले.हा प्रकार अतिशय गंभीर असून एका महिला अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे.
येवला तहसील कार्यालयास निवेदन देताना संघटनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनेही केली. निवेदनावर अध्यक्ष शाम लोंढे, सरचिटणीस तुषार लोणारी, खजिनदार विजय झाल्टे, उपाध्यक्ष केशव विवाल, संघटक धनराज ढिकले, रुपेश तेजी आदींसह कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
(३१ येवला २ )
येवला तहसील कार्यालय येथे ठाणे येथील घटनेचा निषेध करताना मुन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे पदाधिकारी.