येवला तालुका समता परिषदेची कार्यकारिणी बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 12:54 AM2022-01-18T00:54:05+5:302022-01-18T00:54:05+5:30

येवला : येवला तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस व समता परिषद तालुकाध्यक्ष मोहन शेलार यांनी आपल्या दोन्ही पदांचे राजीनामे दिले आहेत.

Yeola taluka Samata Parishad executive dismissed | येवला तालुका समता परिषदेची कार्यकारिणी बरखास्त

येवला तालुका समता परिषदेची कार्यकारिणी बरखास्त

Next
ठळक मुद्देतालुकाध्यक्ष मोहन शेलार यांचा राजीनामा

येवला : येवला तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस व समता परिषद तालुकाध्यक्ष मोहन शेलार यांनी आपल्या दोन्ही पदांचे राजीनामे दिले आहेत.

सलग तीन वेळा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी तर सलग पाच वेळा समता परिषदेचे तालुकाध्यक्षपदी शेलार यांची फेरनिवड झाली होती. नवीन कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष व समता परिषद तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याचे तसेच दोन्हीही संपूर्ण तालुका कार्यकारिणी बरखास्त करत असल्याचे मोहन शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांची व्यक्तिगत भेट घेऊन याबाबत शेलार यांनी चर्चा केली. सतत माझी फेरनिवड केल्याने नवीन इच्छुक कार्यकर्त्यांचा हिरमोड होत आहे. याशिवाय सतत फेरनिवड झाल्याने तालुका कार्यकारिणीत तेच तेच पदाधिकारी परत येत आहेत. या सर्व पक्ष संघटनेतील बाबी शेलार यांनी भुजबळ यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावर सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून एकमताने नवीन अध्यक्ष निवडा अशा सूचना राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेश चिटणीस दिलीप खैरे यांना भुजबळ यांनी केल्या. तर नवीन कार्यकारिणी जाहीर होईपर्यंत प्रभारी जबाबदारी मोहन शेलार यांचेकडे असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी कळविले आहे.
 

Web Title: Yeola taluka Samata Parishad executive dismissed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app