येवला : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद करून शेतकऱ्यांच्या पाठित खंजीर खंजीर खुपसला अशी टीका शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे केली. नायब तहसीलदार राजेंद्र राऊत यांना सामाजिक अंतर ठेवून निवेदन देण्यात आले. जून २०२० मध्ये केंद्र सरकार शेतकरी हिताचे तीन अध्यादेश काढते, कांदा जीवनावश्यक वस्तूच्या यादीतुन काढला त्या आध्यादेशाचे शेतकरी संघटनेने आणि शेतकऱ्यांकडून स्वागतही केले होते. पण अटी शर्तीचा गैरफायदा घेऊन अचानक कांदा निर्यात बंदी घोषित करते याला काय म्हणायचे असा सवाल करून, ही दुटप्पी भूमिका म्हणजे शेतकºयांच्या पाठित खंजीर खुपसला अशी टीका निवेदनात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने शेतकरी हितासाठी त्वरित कांदा निर्यात चालु करावी अन्यथा महाराष्ट्रात ठिकठिकाणी शेतकरी संघटना तिव्र आंदोलन करेन असा इशाराही निवेदनात शेवटी देण्यात आला आहे. निवेदनावर शेतकरी संघटना नेते संतु पाटील झांबरे, संघटनेचे तालुका अध्यक्ष अरूण जाधव, बापूसाहेब पगारे, बाळासाहेब गायकवाड, संध्या पगारे, शिवाजी वाघ,जाफरभाई पठाण, विठ्ठल वाळके, अनिस पटेल, योगेश सोमवंशी, आनंदा महाले आदींसह शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत.
येवला : शेतकरी संघटनेचे तहसिलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 16:29 IST
येवला : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद करून शेतकऱ्यांच्या पाठित खंजीर खंजीर खुपसला अशी टीका शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे केली. नायब तहसीलदार राजेंद्र राऊत यांना सामाजिक अंतर ठेवून निवेदन देण्यात आले.
येवला : शेतकरी संघटनेचे तहसिलदारांना निवेदन
ठळक मुद्दे महाराष्ट्रात ठिकठिकाणी शेतकरी संघटना तिव्र आंदोलन.