येवला : कोष्टी वधू-वर परिचय मेळावा
By Admin | Updated: August 23, 2015 22:51 IST2015-08-23T22:49:29+5:302015-08-23T22:51:05+5:30
देशभरातील समाजबांधवांची हजेरी

येवला : कोष्टी वधू-वर परिचय मेळावा
येवला : देवांग कोष्टी समाजाच्या वतीने अखिल भारतीय बहुभाषिक कोष्टी/कोष्टा वधू-वर परिचय मेळावा येथे झाला. या माध्यमातून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, छत्तीसगढ तसेच विविध १२ राज्यांतून सुमारे पाच
हजार समाजबांधव उपस्थित होते. मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून छत्तीसगढचे आमदार मोतीलाल देवांगण हे होते.
विविध राज्यांतील कोष्टी समाज असंघटित असल्याने प्रगतीपासून दूर राहिला आहे. प्रगतीसाठी समाज संघटित करण्याची आवश्यकता आहे. येवल्यातील वधू-वर संमेलन निश्चित आपल्या पाल्यांना मजबुती देऊन जाईल, अशी खात्री असल्याचे आमदार मोतीलाल देवांगण यांनी यावेळी दिली.
दरम्यान, श्रीदेवांगण पुढे म्हणाले की, हे माझे भाग्यच आहे तसेच छत्तीसगढच्या वगळता इतर राज्यांतील समाजाच्या लोकांची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. तसेच अनेक क्षेत्रांत समाज पुढे जात असल्याचे सांगून याबाबत समाधान व्यक्त केले.
व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राजकीय गुरू व भाजपा गुजरात राज्य मीडियाचे प्रभारी अंबालालजी कोष्टी यांनी मोदींसोबत केलेल्या कार्याच्या आठवणी सांगून मार्गदर्शन केले.
यावेळी अ.भा कोष्टी समजाचे उपाध्यक्ष महेश देवांगण यांनी समाज्याच्या घटकांनी एकत्र येऊन प्रगतीसाठी हातभार लावण्याचे आवाहन केले. कर्नाटक येथून आलेले शंकर बुचडी यांनी कार्याचा लेखाजोखा मांडला.
प्रास्ताविकात समाजाचे अध्यक्ष मनोज भागवत यांनी कार्यक्र माबाबत विविध मुद्दे आणि येवल्याच्या परंपरेचा आढावा घेतला. अ.भा.कोष्टी महिला परिषदेच्या मंजुषा लोळे यांनी महिलांच्या सबलीकरण व हातमाग, पैठणी क्षेत्रातील समाजाचे योगदान स्पष्ट केले.
मेळाव्याचे उद्घाटन सेवकराम देवांगण, महेश देवांगण, कर्नाटक येथील शंकर बुचडी, गुजरातचे भाजपाचे नेते अंबालाल कोष्टी, आ.म.को.परिषद संस्थापक अध्यक्ष अरुण वरोडे, राजाध्यक्ष पंडित इदाते, अध्यक्ष मनोज भागवत आदिंच्या उपस्थितीत करण्यात आले.
या मेळाव्यात सुमारे ७०० युवक, ४५० युवतींनी सहभाग नोंदविला. परिचय मेळावा यशस्वीतेसाठी महिला समिती अध्यक्ष हिरा वाघुंबरे, मनोज सगम, मनोज दिवटे, वाघुंबरे गुरुजी, कैलास घटे, संजय करंजकर, गणेश खळेकर, अतुल घटे, विलास कांबळे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)