येवला ते कोकमठाण पर्यंत पायी दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 18:28 IST2018-09-27T18:28:13+5:302018-09-27T18:28:47+5:30
कोकमठाण येथील जंगलीदास महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त येथील सद्गुरू आत्मा मालिक तपोभूमी पासून कोकमठाण पर्यंत पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

येवला ते कोकमठाण पर्यंत पायी दिंडी
येवला : कोकमठाण येथील जंगलीदास महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त येथील सद्गुरू आत्मा मालिक तपोभूमी पासून कोकमठाण पर्यंत पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
येवल्यातील सद्गुरू आत्मा मालिक तपोभूमी येथील भूमीवर सन ्ल१९६७ मध्ये जंगलीदास महाराज यांनी कठोर तपश्चर्या करून ११ महिन्याचे निराहर तप केले. अनंत चतुर्दशीचे दिवशी त्यांना आत्मसाक्षात्कार झाला म्हणून आत्मा मालिक परिवारातील भाविक व भक्तगण हा दिवस आत्मसाक्षात्कारी दिवस म्हणून साजरा करतात.
या निमित्ताने येवला ते कोकमठाण पायी दिंडी काढण्यात आली. घराघरांतुन १११ बांबूच्या पाट्या सजवून १११ प्रकारची मिठाई सद्गुरू चरणी कोकमठाण येथे अर्पण करण्यात आली. दिंडीचा सोहळा अत्यंत भव्य होता.