येवला इनरव्हील क्लब विविध पुरस्कारांनी सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:11 IST2021-07-11T04:11:16+5:302021-07-11T04:11:16+5:30

इनरव्हीलच्या माजी अध्यक्ष पिनल वर्मा, तसेच विद्यमान अध्यक्ष सुचेता मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली क्लबने अनेक स्तुत्य उपक्रम यशस्वी राबविले आहेत. ...

Yeola Inner Wheel Club honored with various awards | येवला इनरव्हील क्लब विविध पुरस्कारांनी सन्मानित

येवला इनरव्हील क्लब विविध पुरस्कारांनी सन्मानित

इनरव्हीलच्या माजी अध्यक्ष पिनल वर्मा, तसेच विद्यमान अध्यक्ष सुचेता मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली क्लबने अनेक स्तुत्य उपक्रम यशस्वी राबविले आहेत. या कार्याची दखल घेत इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३०३ च्या चोपडा येथील पुरस्कार वितरण समारंभात येवला इनरव्हील क्लबला एकूण वीस पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यावेळी जयश्री शहा यांना उत्तेजनार्थ तर अध्यक्ष सुचेता मंडलेचा यांना प्रोग्रेसिव्ह जेम प्रेसिडेंट तसेच पिनल वर्मा यांना डायनॅमिक प्रेसिडेंट या विशेष पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या प्रसंगी शैला कलंत्री, सोनल पटणी, डॉ. संगीता पटेल, वसुधा गुजराथी, भारती पाटील, माया टोणपे, उषाताई शिंदे, शीतल उदावंत, विजया पाटील, माधवी शेंडे, संगीता देहाडराय, अनिता पांढरे, नीता शहा, निलम पटणी, योगिता पटेल, पद्मा शिंदे, वंदना सोनवणे, अंकिता सोमाणी, सुषमा पाटील आदी सदस्य उपस्थित होते.

फोटो- ०९ येवला इनरव्हील

090721\005809nsk_31_09072021_13.jpg

फोटो- ०९ येवला इनरव्हील 

Web Title: Yeola Inner Wheel Club honored with various awards