येवला : पालखेड डावा कालव्याच्या पाणी वितरणात दुजाभाव पाणीवापर सोसायट्या पाण्यापासूनच वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:08 IST2018-03-11T00:08:32+5:302018-03-11T00:08:32+5:30

येवला : पालखेड डावा कालव्याच्या दुसºया आवर्तनाचा खेळखंडोबा झाला असून, जेथे पाणी हवे तेथे ते पोहचले नसून, नको तेथे शेतात तळे साचले आहे.

Yeola: Due to water distribution in Palkhed left canal irrigation water resources are deprived of water | येवला : पालखेड डावा कालव्याच्या पाणी वितरणात दुजाभाव पाणीवापर सोसायट्या पाण्यापासूनच वंचित

येवला : पालखेड डावा कालव्याच्या पाणी वितरणात दुजाभाव पाणीवापर सोसायट्या पाण्यापासूनच वंचित

ठळक मुद्देउशिरा सोडलेल्या आवर्तनाने शेतकरी हवालदिल धरणे दिले तरी पाणीवाटपाचा घोळ

येवला : पालखेड डावा कालव्याच्या दुसºया आवर्तनाचा खेळखंडोबा झाला असून, जेथे पाणी हवे तेथे ते पोहचले नसून, नको तेथे शेतात तळे साचले आहे. त्यामुळे कित्येक शेतकºयांना पाण्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. जलयुक्त शेत हे नवीनच धोरण कालवा प्रशासनाने वापरल्याची बाब उघड झाली आहे. पालखेड लाभ क्षेत्राखालील वितरिका क्र. ३५ आठमाही असून, तिला पाणी नाही. त्याबरोबरच अनेक संस्थांना अजून पाणी मिळालेले नाही. उशिरा सोडलेल्या आवर्तनाने शेतकरी हवालदिल झाला आहे. चालू हंगाम रब्बीसाठी पालखेडचे दुसरे आवर्तन दि. १ फेब्रुवारी रोजी ठरलेले असताना ८ फेब्रुवारी रोजी सोडण्यात आले. यंदा १०० टक्के धरणे टक्के धरणे भरलेली असतानासुद्धा कमी दिवसाचे आवर्तन देण्यात येत आहे. त्यामुळे आपल्याला पूर्ण पाणी मिळेल की नाही या शंकेने शेतकºयांनी उचल खाल्ली. जिल्हाधिकाºयांना निवेदने दिली, पालखेडच्या जळगाव नेऊर कार्यालयासमोर धरणे दिले तरी पाणीवाटपाचा घोळ सुरूच आहे. अनेक पाणीवापर संस्थांना अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. तरी कालवा प्रशासनाने नको तेथील पाणी बंद करून शेतकºयांना समान न्यायाने सर्वांना पाणी उपलब्ध करून द्यावे. शेतात पाणी सोडून कालव्याच्या आवर्तनामधून भूजल पातळी कशी वाढवायचे धडे भाजपा सरकारच्या काळात दिले जात असल्याची चर्चा शेतकरी करू लागले आहेत. भाजपाचे जलयुक्त शिवार अभियान २०० टक्के यशस्वी झाल्याचे चित्र पूर्णत्वास जात आहे.

Web Title: Yeola: Due to water distribution in Palkhed left canal irrigation water resources are deprived of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी