यादवराव तुंगार यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 13:02 IST2020-03-17T13:01:53+5:302020-03-17T13:02:01+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा माजी नगराध्यक्ष यादवराव तुंगार यांचे आज सकाळी १० वाजता निधन झाले.

यादवराव तुंगार यांचे निधन
त्र्यंबकेश्वर : येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा माजी नगराध्यक्ष यादवराव तुंगार यांचे आज सकाळी १० वाजता निधन झाले. गेल्या ३० वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय होते. गोवा मुक्ती चळवळ आंदोलनात ते सहभागी झाले होते. गावातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून अनेक जण त्यांच्याकडे सल्ले घ्यायला जात असत. सिंहस्थ कुंभमेळ्यात त्यांच्याकडे नगराध्यक्षाचा पदभार होता. त्यावेळी त्यांनी आपल्या कार्यशैलीने कुंभमेळा यशस्वी केला.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.