शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
2
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
3
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
4
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
5
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
6
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
7
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
8
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
9
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
10
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
11
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
12
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
13
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
14
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
15
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
16
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
17
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
18
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
19
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
20
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख ६६ हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 01:51 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेला नाशिक विभागातून सुमारे १ लाख ६६ हजार विद्यार्थी प्रविष्ट होणार असून, यात नाशिक जिल्ह्यातील ७५ हजार ४५ विद्यार्थी प्रविष्ट होणार असल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष के. बी. पाटील यांनी दिली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ७५ हजार ४५ विद्यार्थ्यांचा समावेश

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेला नाशिक विभागातून सुमारे १ लाख ६६ हजार विद्यार्थी प्रविष्ट होणार असून, यात नाशिक जिल्ह्यातील ७५ हजार ४५ विद्यार्थी प्रविष्ट होणार असल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष के. बी. पाटील यांनी दिली आहे.विशेष परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक दिवस आधीपर्यंत अर्ज करण्याची संधी असल्याने यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले असून, मंडळाने विभागातील चारही जिल्ह्यांत परीक्षा केंद्राचा आढावा घेण्याची तयारी सुरू केली आहे. बारावीच्या परीक्षेचे हे अंतिम वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी २०२० ते १८ मार्च २०२० या कालावधीत होणार आहे. राज्य मंडळाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत एकाच वेळी परीक्षा घेण्यात येणार असून, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे स्वतंत्रपणे नियोजन करण्यात आले आहे. संबंधित वेळापत्रक परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातून ७५ हजार ४५, धुळे २५ हजार २३३, जळगाव ४९ हजार ३४१ व नंदुरबार जिल्ह्यातून १६ हजार ४६२ असे एकूण १ लाख ६६ हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहे. दरम्यान, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसह अनेक खासगी क्लासेसचालकांनी अभ्यासक्रमाच्या पुनरावलोकनास सुरुवात केली असून, पालक व शिक्षकांकडूनही विद्यार्थ्यांना अभ्यासाला लागण्याचा सल्ला दिला जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकexamपरीक्षा