शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

शॉर्टकटसाठी रॉंग साइड चुकीचीच; ही वेळ बचत जीवघेणी ठरू शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:11 IST

---ही आहे रॉंग साइड---- १) जलतरण तलाव सिग्नल नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील जलतरण तलाव येथील सिग्नल जणू ‘रॉंग साइड’साठीच ...

---ही आहे रॉंग साइड----

१) जलतरण तलाव सिग्नल

नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील जलतरण तलाव येथील सिग्नल जणू ‘रॉंग साइड’साठीच ओळखला जातो की काय, अशी शंका येथील दृश्यावरून न आल्यास नवलच ! चांडक सर्कलकडून शासकीय वसाहतींच्या रस्त्याने त्र्यंबकरोडवर येणारी सर्व वाहने सर्रासपणे उजवीकडे वळण घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ येऊन थांबतात. सातपूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा सिग्नल लाल होताच ही थांबलेली वाहने टिळकवाडी किंवा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिशेने जातात.

अपघातांना निमंत्रण

एका बाजूचा सिग्नल लाल असला तरी टिळकवाडीकडून येणाऱ्या वाहनांचा सिग्नल हिरवा झालेला असतो, यामुळे वाहने समोरासमोर येऊन अपघाताचा धोका संभवतो. अनेकदा लहान-मोठे अपघात घडतात.

--पोलीस पाचशे मीटर लांब---

येथे वाहतूक पोलीस थांबत नाही, तर येथून सुमारे पाचशे मीटर अंतरावर वेद मंदिराच्या कोपऱ्यावर उभे राहून ‘सावज’ शोधतात. रिक्षाचालकांकडून सर्रासपणे सिग्नलकडे कानाडोळा केला जातो. मात्र पोलीस केवळ दुचाकीस्वारांनाच ‘टार्गेट’ करतात.

२) वकीलवाडी

एमजीरोडवरून वकीलवाडीमध्ये जाण्यासाठी एकेरी प्रवेश दिला गेला आहे आणि अशोकस्तंभ, घनकर गल्लीतून वकीलवाडीकडे वाहनांना प्रवेश बंद आहे; मात्र रॉंग साइड काही वाहने या अरुंद रस्त्याने एमजी रोडच्या विरुद्ध बाजूने येतात अन‌् वाहतूक कोंडी होते.

--अपघातांना निमंत्रण--

या भागात व्यापारी संकुले असल्याने या अरुंद रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची पार्किंग असते. यामुळे वाहनांना धक्का लागून अपघाताच्या घटना आणि वादविवाद दररोजच होतात.

--पोलीस गायबच--

वाहतूक पोलीस कर्मचारी या परिसरात फिरकतच नाहीत. सर्रासपणे वाहतुकीचे तीनतेरा होत असतानाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस वकीलवाडीत अपवादानेच एखाद्या दिवशी येतात.

---

३) रविवार कारंजा

रविवार कारंजा चौकातून अशोकस्तंभाकडे तसेच रेडक्रॉस सिग्नलकडे जाण्यासाठी प्रवेश बंद आहे. हे दोन्ही रस्ते केवळ एकेरी वाहतुकीसाठी आहेत; मात्र तरीदेखील बहुतांश वाहनचालक विरुद्ध बाजूने येण्याचा प्रयत्न करतात अन‌् अपघातांना निमंत्रण देतात. सकाळपासून तर दुपारपर्यंत हे चित्र कायम असते.

--वाहतूक कोंडी नित्याचीच

हा चौक शहरातील अत्यंत वर्दळीचा बाजारपेठ असलेला चौक आहे. येथे सतत वाहतूक कोंडीची समस्या पहावयास मिळते. लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत येथून वाट काढणे पादचाऱ्यांनाही मुश्कील होत आहे.

---पोलिसांची डोळेझाक--

एक वाहतूक पोलीस रेडक्रॉस सिग्नल चौकात असतो. वाहनचालक रविवार कारंजाकडून विरुद्ध बाजूने जरी आला तरी तो मध्ये रेडक्रॉस दवाखान्यापासून वळण घेतो किंवा घनकर गल्लीत वळण घेऊन पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेक करत निसटतो. रविवार कारंजा चौकात नियुक्त असलेल्या पोलिसांकडून अशा वाहनचालकांना तेथेच रोखणे गरजेचे आहे.

---पाच महिन्यांत एक लाख ८२ हजारांचा दंड---

जानेवारीपासून मेअखेरपर्यंत शहर वाहतूक शाखेने रॉंग साइड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत सुमारे एक लाख ८२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यापैकी केवळ १५ हजारांचा दंड अद्याप वसूल झाला आहे. सुमारे १८२ वाहनचालकांनी रॉंग साइड शॉर्टकट निवडल्याचे आकडेवारीवरून दिसते. मोटार वाहन कायद्यानुसार चुकीच्या बाजूने वाहन दामटविणे गुन्हा ठरतो. चुकीच्या बाजूने वाहन चालविताना दुर्दैवाने अपघात घडल्यास मोटार वाहनाचा अपघाती विम्याच्या लाभापासूनही संबंधित वाहनचालक व त्याचे वारसदार वंचित राहण्याची शक्यता निर्माण होते.

पॉइंटर्स--

शहरात पाच महिन्यांत अपघात - २०३

मृत्यू ७१/ जखमी १९३

----

===Photopath===

260621\26nsk_50_26062021_13.jpg

===Caption===

जलतरण तलाव सिग्नल