ब्रांझ पदक मिळविणाऱ्या पहिलवान रमेश कुकडे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 01:10 IST2021-12-15T01:09:46+5:302021-12-15T01:10:03+5:30

मुरंबी येथे राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील भूमिपुत्र पहिलवान रमेश कुकडे व विजय कातोरे यांचा सत्कार करण्यात आला.

Wrestler Ramesh Kukde felicitated for winning bronze medal | ब्रांझ पदक मिळविणाऱ्या पहिलवान रमेश कुकडे यांचा सत्कार

ब्रांझ पदक मिळविणाऱ्या पहिलवान रमेश कुकडे यांचा सत्कार

वाडीवऱ्हे : मुरंबी येथे राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील भूमिपुत्र पहिलवान रमेश कुकडे व विजय कातोरे यांचा सत्कार करण्यात आला.

बरेली येथे झालेल्या इंटरकमांड आर्मी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय सैन्य दलातील पहिलवान रमेश कुकडे यांनी ८७ किलो वजन गटात कुस्ती स्पर्धेत ब्रांझ मेडल मिळविले, तसेच वाडीवऱ्हे गावचे माजी सैनिक विजय कातोरे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन राजयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आत्माराम मते यांनी केले होते.

त्यावेळी पहिलवान प्रवीण पाळदे, पहिलवान मोहन कातोरे, शरद मुर्तडक, विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे, युवानेते तुकाराम वारघडे, योगेश शेलार, सरपंच बापू मते, उपसरपंच रेवन मते, दत्तू मते, संतोष मते, सदस्य रोहिदास टिळे, माणिक मुर्तडक, गोविंद डगळे, पहिलवान आकाश शिंदे, सुनील मते, सचिन मते, तानाजी मते, गोकुळ धोगडे, रूपेश नाठे, विशाल भोर, वैभव दातीर, बोंबले, पाडुरंग पोटिदे, संजय मते, किरण मते, पंढरी शिंदे, शरद मते व मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Web Title: Wrestler Ramesh Kukde felicitated for winning bronze medal