नाशिक : सराफ बाजारातील एका दुकानातील सोन्याचे डिझाइन बनविणाऱ्या व्यक्तीची मंगळसुत्र बनवून देण्याच्या बहाण्याने आठ तोळे सोन्याची लड घेऊन मंगळसूत्र न देता फसवणूक केल्याची घटना घडली आहे. डिझाइन बनविणारा कारागीर संजय वसंतराव उदावंत याच्याकडून पश्चिम बंगाल येथील हुबळी बालहिजारी येथील मृत्युंजय महादेव कांजी ८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र बनविण्यासाठी घेऊन गेला. परंतु मंगळसूत्र बनवून न देता विश्वासघात करीत त्याने अपहार केला. याप्रकरणी उदावंत यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सुवर्ण नक्षीकाराने घातला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 23:48 IST