शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सुधारणेला वाव !

By किरण अग्रवाल | Published: July 22, 2018 1:21 AM

वैवाहिक संबंधातील विच्छेदनाच्या म्हणजे काडीमोडच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत, त्यामागे पती-पत्नीमधील बेबनावाचे कारण प्रामुख्याने आढळून येते. सदरचा विषय नव्याने चिंतेचा बनू पाहत असताना जुनी जळमटेही दूर होताना दिसत नाहीत. मूलबाळ होत नसल्याच्या कारणातून सासरी होणारा छळ व त्यातून विवाहितेची आत्महत्या घडून येण्याचे प्रकारही कायम असल्याचे बघता समाजातले मागासलेपण दूर होऊ न शकल्याचेच म्हणता यावे.

ठळक मुद्देकुटुंबातील वाद-विवाद हा तसा संपुष्टात न येणाराच विषय घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहचलेले अनेकजण बघावयास मिळतात, मूल दत्तक घेऊन त्याच्या संगोपनातून आयुष्य फुलवणारेही मोठ्या संख्येत

कुटुंबातील वाद-विवाद हा तसा संपुष्टात न येणाराच विषय आहे. भांड्याला भांडे लागणार म्हटल्यावर आवाज होणारच. परंतु काळानुरूप या आवाजाचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी घरात वडीलधारी मंडळी असायची म्हणून पती-पत्नीतील वाद विकोपाला जाण्याचे प्रमाण कमी असायचे, हल्ली विभक्त कुटुंबावस्थेमुळे ते प्रमाण वाढले आहे. जरा जराशा कारणांमुळे परस्परात मतभिन्नता होऊन घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहचलेले अनेकजण बघावयास मिळतात, कारण शिकल्या-सवरल्यापणातून आलेला स्वाभिमान त्यांना पडती बाजू घेऊ देत नाही. कुठपर्यंत ताणायचे आणि कुठे सोडून द्यायचे हे सांगणारेच घरात नसतात. त्यातून वादाची परिसीमा गाठली जाते. पण याच शिक्षणातून सामंजस्य वा समजूतदारी का येत नाही हा प्रश्न आहे. अर्थात, मुद्दा तो नाही. शिक्षण वाढले आहे, विज्ञान प्रगत झाले आहे, तरी मूलबाळ होत नाही म्हणून छळल्या जाणाऱ्या व त्याकारणाने गळफास लावून घेणाºया विवाहिता पाहता, जीव गमावण्यामागचे हे कारण आज कालसुसंगत वाटते का, हा खरा मुद्दा आहे. बरे, ग्रामीण भागातील विचारांचा बुरसटलेपणा पूर्णत: कमी झालेला नसल्यामुळे असे होत असेल म्हणून गैरसमज करून घेता येऊ नये. शहरी भागातही असे प्रकार सुरूच आहेत. नाशिकच्या सिडकोतील पंडितनगर भागातील एका भगिनीने याच कारणास्तव लावून घेतलेला गळफास यासंदर्भात समाजमन अस्वस्थ करणारा आहे. आत्महत्यांच्या घटनांत अलीकडे अधिकतर कर्जबाजारीपणा वा परिस्थितीपुढे हात टेकावे लागल्याने आलेल्या मनाच्या खचलेपणाची कारणे दिसून येत असतात, त्याचसोबत मूलबाळ होत नसल्यातून होणाºया छळाचे पारंपरिक कारणही टिकून असल्याचे आढळून यावे, हे विशेष. कारण, वंध्यत्वाच्या समस्येवर विज्ञानाने मात केल्याची अनेक उदाहरणे आज समोर आहेत. स्वत:ला आई होता आले नाही तरी, आईपण अनुभवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. मूल दत्तक घेऊन त्याच्या संगोपनातून आयुष्य फुलवणारेही मोठ्या संख्येत आहेत. असे असताना विचारांची चौकट न बदलता केवळ मूलबाळ होत नाही म्हणून सुनेचा छळ केला जात असेल व सात-सात वर्षे संसाराचा गाडा हाकून झालेल्या विवाहितेला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नसेल, तर या परिस्थितीला मागासलेपणाखेरीज दुसरे कोणते नाव ठेवता यावे? आपण नुसतेच शिकलो; पण सवरलो नाहीत. काळानुरूप लोकांची मानसिकता बदलली असे नक्कीच म्हणता येते, पण त्याज्य काय? म्हणजे टाकून काय द्यायचे हेच अनेकांना उमजले नाही असेच यावरून स्पष्ट व्हावे, तेव्हा, समाजसुधारणेला अजूनही मोठा वाव आहे, हाच यातील मथितार्थ!

टॅग्स :Familyपरिवार