मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात बालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 18:23 IST2019-04-26T18:20:19+5:302019-04-26T18:23:09+5:30
भटक्या कुत्र्याने जोशीवाडीतील राहुल रतन जाधव (५) या लहान मुलावर हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.

मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात बालक जखमी
सिन्नर : भटक्या कुत्र्याने जोशीवाडीतील राहुल रतन जाधव (५) या लहान मुलावर हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.
राहुल हा परिसरात फिरत असताना अचानक कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करीत त्याचा हात, पाच व पाठीला गंभीर चावे घेतले. परिसरातील रहिवाशांनी तातडीने धाव घेऊन कुत्र्याला हुसकावून लावत त्याची सुटका केली. नगरपालिका रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यास नाशिकच्या रुग्णालयात पाठविण्यात आले.