दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम तयारी अंतर्गत मिलरोलर पूजन नुकतेच चेअरमन श्रीराम शेटे यांचे हस्ते झाले.कादवा सहकारी साखर कारखान्याची आगामी गळीत हंगामाची तयारी सुरू आहे या वर्षी पूर्ण कार्यक्षमतेने जास्तीत जास्त गाळप करन्याचे उिद्दष्ट असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन शेटे यांनी केले.कारखान्याचे संचालक मधुकर गटकळ यांच्या हस्ते रोलर पूजन करण्यात आले. यावेळी व्हा चेअरमन उत्तम भालेराव, संचालक दिनकर जाधव, सुकदेव जाधव, शहाजी सोमवंशी, मधुकर गटकळ, त्र्यंबक संधान, बापू पडोळ, विश्वनाथ देशमुख, संपत कोंड, बबनराव देशमुख, रघुनाथ जाधव, बाळासाहेब दिवटे, युनियन अध्यक्ष दत्तात्रय वाकचौरे, युनियन पदाधिकारी, सर्व अधिकारी व कामगार उपस्थित होते. स्वागत व आभार प्र. कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी मानले. (फोटो ०५कादवा)
कादवा कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 18:04 IST
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम तयारी अंतर्गत मिलरोलर पूजन नुकतेच चेअरमन श्रीराम शेटे यांचे हस्ते झाले.
कादवा कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन
ठळक मुद्देजास्तीत जास्त गाळप करन्याचे उिद्दष्ट