मालेगाव : येथील वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने प्रभुरामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन व भजन करण्यात आले. देशवासीयांवर ओढवलेल्या कोविड-१९च्या संकटातून मुक्तता व्हावी, अशी प्रार्थना प्रभुरामचंद्रांच्या चरणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे संजय जगताप, उपाध्यक्ष पापान्ना यादव, सचिव रवींद्र कुलकर्णी, संजय तरवटे, वाल्मीक पगारे, संजय अहिरे, गजानन यादव, मधु यादव, दत्ता यादव, दिनेश जाधव, संतोष शर्मा, दिलीप शर्मा, किरण काथे, दुर्गेश अग्रवाल, गोटूबाबा अग्रवाल, अनिल देशपांडे, भगवान सूर्यवंशी, खंडू अहिरे, राजू पाटील, रूपेश वाघ, पांडुरंग यादव, गोपाल मोरे, भूषण वाघ, रमेश पाटील, सुमित वर्मा, नरेंद्र जाधव, मनोहर भोसले उपस्थित होते.
मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 01:31 IST