The world turned around, but Mangeshkar had a special affection for Nashik | जग फिरलो, पण मंगेशकरांना नाशिकबाबत विशेष आपुलकी: हृदयनाथ मंगेशकर
कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी पंडित हृदयनाथ मंगेशकर, प्रशांत जुन्नरे यांच्यासमवेत बाबाज् थिएटरच्या वतीने गौरव करण्यात आलेले डॉ. मिलिंद पिंप्रीकर, अभय ओझरकर, डॉ. सुमुखी अथणी, विनायक रानडे, संतोष हुदलीकर, विजयालक्ष्मी मणेरीकर व मान्यवर.

ठळक मुद्देबाबाज् थिएटरचा कृतज्ञता सोहळा

नाशिक : संगीताच्या निमित्ताने आम्ही मंगेशकर कुटुंबीय जगभर फिरलो, पण नाशिकबाबत कायमच विशेष आपुलकी वाटत आली आहे. आमचे नाशिक शहराची ऋणानुबंध खूप जुने असून ते अद्यापही कायम आहेत, असे प्रतिपादन प्रख्यात संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी केले.
बाबाज् थिएटरच्या वतीने संस्थेच्या १९व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब आॅफ नाशिक मिडटाऊनच्या संंयुक्त विद्यमाने आयोजित कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, बाबाज् थिएटरचे संस्थापक प्रशांत जुन्नरे, मधुकर झेंडे, रोटरीचे अवतारसिंग पनफेर, शिरीष रायरीकर, एन. सी. देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पं. मंगेशकर यांनी नाशिकशी असलेल्या जुन्या स्नेहसंबंधांची आठवण सांगून माझ्या अनेक आठवणी नाशिकशी निगडित असल्याचे नमूद केले.
यावेळी कला व साहिंत्य क्षेत्रातील विविध मान्यवरांचा गौरव करण्यात आला. पुरस्कारार्थींच्या वतीने डॉ. पिंप्रीकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर झालेल्या सदाबहार लता-आशा या कार्यक्रमाद्वारे नमिता राजहंस आणि सहकाऱ्यांनी अनेक गाणी सादर करीत रसिकांची मने जिंकली. बाबाज् थिएटरच्या वतीने सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन दररोज दि. १८ सप्टेंबरपर्यंत करण्यात आले आहे.
जुन्नरे यांना पं. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
नाशिकमध्ये बाबाज् थिएटरच्या माध्यमातून नाशिककरांना असंख्य सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देणाºया प्रशांत जुन्नरे यांना आमच्या वडिलांच्या नावे दिला जाणारा पं. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करीत असल्याची घोषणादेखील पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी यावेळी केली. दरवर्षी हा पुरस्कार लतादिदीच्या हस्ते देण्याची परंपरा आहे.
यांचा झाला गौरव
संस्थेच्या वतीने संतोष हुदलीकर, विनायक रानडे, विजयालक्ष्मी मणेरीकर, डॉ. सुमुखी अथणी, अभय ओझरकर आणि डॉ. मिलिंद पिंप्रीकर यांचा सन्मान पंडितजींच्या हस्ते करण्यात आला. तसेच सी. एल. कुलकर्णी यांच्या काव्यगीतांचे खंड भेट देऊन पंडितजींचा सन्मान करण्यात आला.


Web Title: The world turned around, but Mangeshkar had a special affection for Nashik
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.