शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या सात विद्यार्थ्यांचा जागतिक विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:33 IST

इस्तंबूल (तुर्की) येथे मेमोरियाड मेंटल मॅथ आणि मेमरी फेडरेशन आयोजित तुर्की ओपन चॅम्पियनशिप २०१८ स्पर्धेमध्ये नाशिकच्या सात विद्यार्थ्यांनी जागतिक विक्रम करीत १५ पदके मिळवून नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे

सातपूर : इस्तंबूल (तुर्की) येथे मेमोरियाड मेंटल मॅथ आणि मेमरी फेडरेशन आयोजित तुर्की ओपन चॅम्पियनशिप २०१८ स्पर्धेमध्ये नाशिकच्या सात विद्यार्थ्यांनी जागतिक विक्रम करीत १५ पदके मिळवून नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे. भारतीय जिनिअस किड संघाने ओपन व किड्स प्रकारात ४१ मेडल्स व १५ सुवर्णपदके मिळवून ही स्पर्धा जिंकली.  या स्पर्धेत भारतातून जिनिअस किड्सच्या वेगवेगळ्या शाखांमधून ४१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये नाशिकमधील जिनिअस किड-व्हिज किड, गंगापूररोड अकॅडमीचे ७ विद्यार्थी सहभागी झाले होते. मास्टर आर्यन शुक्ल (अशोका युनिव्हर्सल स्कूल, अर्जुननगर), गार्गी जोशी (अशोका युनिव्हर्सल स्कूल, वडाळा) व अरुंधती पताडे (होरायझन अकॅडमी) या मुलांनी मिळून २ जागतिक विक्रम तसेच ८ सुवर्णपदके व १५ पदकेमिळवून उच्चांक प्रस्थापित केला आहे. तनुश्री जगताप (अशोका युनिव्हर्सल स्कूल, अर्जुननगर) रोहिणी शिरडकर व दुर्वा माळी (रचना विद्यालय), समृद्धी शेवाळे (न्यू मराठा हायस्कूल) या स्पर्धकांनी त्यांनी भाग घेतलेल्या स्पर्धेमध्ये पहिल्या १० मध्ये येऊन विशेष मानांकन प्राप्त केले आहे. जिनिअस किड-व्हिज किड अकादमीचे नितीन जगताप, वैशाली जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. आर्यन शुक्लने या स्पर्धेमध्ये दोन वर्ल्ड रेकॉर्ड सहित ७ सुवर्णपदके आणि १० मेडल्स मिळवून नवा जागतिक उच्चांक प्रस्थापित केला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाNashikनाशिक