पवार फार्मसी महाविद्यालयात कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:21 IST2018-02-22T00:21:25+5:302018-02-22T00:21:43+5:30

कळवण येथील लोकनेते डॉ. जे. डी. पवार कॉलेज आॅफ फार्मसीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने दोन दिवसीय ‘पोटेन्शिअल अ‍ॅप्लिकेशन आॅफ फ्लुइडाइज्ड ब्रेड प्रोसेसर इन फार्मास्युटिकल्स’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 Workshop at Pawar pharmacy college | पवार फार्मसी महाविद्यालयात कार्यशाळा

पवार फार्मसी महाविद्यालयात कार्यशाळा

कळवण : कळवण येथील लोकनेते डॉ. जे. डी. पवार कॉलेज आॅफ फार्मसीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने दोन दिवसीय ‘पोटेन्शिअल अ‍ॅप्लिकेशन आॅफ फ्लुइडाइज्ड ब्रेड प्रोसेसर इन फार्मास्युटिकल्स’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  महाविद्यालयात शैक्षणिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आपल्या सभोवताली औद्योगिक क्षेत्रात काय नवनवीन तंत्र व संशोधन चालू आहे याची माहिती होण्यासाठी दरवर्षी चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन केले जाते. त्याचाच भाग म्हणून ‘फ्लूइडाइज्ड बेड प्रोसेसर’ या आधुनिक मशीनचा वापर कसा करावा, त्यापासून औषधनिर्मिती क्षेत्रातील वेगवेगळी उत्पादने कशी घ्यावीत, याची विस्तृत माहिती होण्यासाठी व प्रात्यक्षिकाद्वारे समजण्यासाठी लोकनेते डॉ. जे. डी. पवार कॉलेज आॅफ फार्मसी येथे राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे यशस्वीरीत्या झाली. कार्यशाळेसाठी विविध विद्यापीठ व राज्यातून सुमारे ५५ शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेची प्रस्तावना प्राचार्य अविष मारू यांनी मांडली तर नियोजन प्रा. राजेंद्र सुरवसे यांनी केले.

Web Title:  Workshop at Pawar pharmacy college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.