Workshop on 'Our Village, Our Development' | ‘आमचं गाव, आमचा विकास’ अंतर्गत कार्यशाळा
‘आमचं गाव, आमचा विकास’ अंतर्गत कार्यशाळा

ठळक मुद्देविल्होळी येथे प्रशिक्षण : पायाभूत सुविधांबाबत चर्चासत्र; अधिकाऱ्यांचा सहभाग

विल्होळी : येथे नाशिक जिल्हा परिषद गणस्तरीय ‘आमचं गाव आमचा विकास’ उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा येथील हनुमान मंदिर येथे संपन्न झाली.
१४व्या वित्त आयोगअंतर्गत आमचा गाव आमचा विकास उपक्र माअंतर्गत तयार करण्यात येणाºया ग्रामपंचायत आराखड्यात महिला व बालकल्याण, मानव विकास निर्देशांक तसेच गावांच्या गरजेनुसार आवश्यक पायाभूत सुविधा अशा अनेक विषयांवर कार्यशाळा संपन्न झाली. या प्रशिक्षण कार्यशाळेत प्रशिक्षक प्रभारी अधिकारी एस. एस. पगार, ज्योती गांगुर्डे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, पशुवैद्यकीय अधिकारी, ग्राम संधान गट, महिला स्वयंसहायता गट, जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक सर्व उपस्थित होते. यावेळी सरपंच बाजीराव गायकवाड, सदानंद नवले, दिलीप चौधरी, अलकाताई झोंबाड, ठकूबाई बेंडकोळी, प्रशांत देशमुख, निर्मलाताई कड, संपत बोंबले, ग्राम विकास अधिकारी बळीराम पगार, रवींद्र जाधव, भास्कर पाडवी, रत्नमाला भोजणे, आशा गौराणे, शिवदास शिंदे, गणस्तरावरील कर्मचारी उपस्थित होते.
व्यावसायिकांसाठी विविध योजना
दोन दिवसीय कार्यशाळेत अंगणवाडीसाठी-बालकांच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक खेळणी पुरविणे, गणवेश पुरविणे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, शौचालय बांधकाम, कुपोषित बालकांना आहार पुरविणे, अंगणवाडी डिजिटल करणे, ई-लर्निंग उपक्र म अभ्यासक्र मानुसार खेळाचे साहित्य पुरविणे, वाचनालयासाठी प्रत्येक शाळेला दोनशे पुस्तक देणे, युवकांसाठी व्यवसाय प्रशिक्षण घेणे, सामूहिक शेती, करार शेती, कृषी अवजारे स्थापन करणे, शेतकरी प्रशिक्षण, विपणन, उत्पादन वृद्धी, शेतीविषयक सल्ला केंद्राची स्थापना करणे, दुग्धउत्पादन प्रोत्साहन देणे, कुक्कुटपालन, शेळीपालन अर्थसहाय्य करणे, सामूहिक शेततळे, बंधारा बांधणे, महिलांसाठी व्यवसाय कौशल्य विकास कार्यक्र माचे आयोजन करणे, स्मशानभूमी बांधणे या व्यतिरिक्त अशा अनेक प्रकारच्या योजनांची प्रशिक्षण व माहिती दोन दिवसीय कार्यशाळेत देण्यात आली.

Web Title: Workshop on 'Our Village, Our Development'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.