आपत्ती व्यवस्थापनावर आज कार्यशाळा सिंहस्थ कुंभमेळा : उद्या रंगीत तालीम

By Admin | Updated: May 28, 2014 01:32 IST2014-05-28T01:23:24+5:302014-05-28T01:32:26+5:30

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात संभाव्य आपत्ती लक्षात घेता शासकीय यंत्रणेने केलेल्या तयारीचा आढावा व मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख अधिकारी नाशकात दाखल होत असून, बुधवारी त्यांच्या उपस्थितीत शासकीय अधिकार्‍यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, तर त्यानंतर तयारीची रंगीत तालीमही करवून घेण्यात येणार आहे.

Workshop on Disaster Management Workshop Simhastha Kumbh Mela: Tomorrow Colored Training | आपत्ती व्यवस्थापनावर आज कार्यशाळा सिंहस्थ कुंभमेळा : उद्या रंगीत तालीम

आपत्ती व्यवस्थापनावर आज कार्यशाळा सिंहस्थ कुंभमेळा : उद्या रंगीत तालीम

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात संभाव्य आपत्ती लक्षात घेता शासकीय यंत्रणेने केलेल्या तयारीचा आढावा व मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख अधिकारी नाशकात दाखल होत असून, बुधवारी त्यांच्या उपस्थितीत शासकीय अधिकार्‍यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, तर त्यानंतर तयारीची रंगीत तालीमही करवून घेण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्यातच सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित सर्वच खात्यांकडून याबाबत आराखडा तयार करण्याचे काम करून घेतले असून, त्याचे सादरीकरण आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांसमक्ष करण्यात येणार आहे. या आराखड्यातील त्रुटी अथवा दुरुस्तीबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात येईल. सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधितच नव्हे, तर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा शासकीय यंत्रणेला सक्षमपणे सामना करता यावा यासाठी जिल्‘ातील सर्व तहसीलदार, प्रांत अधिकार्‍यांनाही या कार्यशाळेत पाचारण करण्यात येणार आहे. दिवसभर चालणार्‍या या कार्यशाळेनंतर दुसर्‍या दिवशी प्राधिकरणाचे अध्यक्ष कर्नल दत्ता व सदस्य जे. एस. सिन्हा हे नाशकात दाखल होतील. सिंहस्थ कुंभमेळा भरणार्‍या ठिकाणांची पाहणी केल्यानंतर शासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शहरात कोठेतरी रंगीत तालीम घेण्यात येणार आहे.

Web Title: Workshop on Disaster Management Workshop Simhastha Kumbh Mela: Tomorrow Colored Training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.