शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

महिला नगरसेविकांना कामकाजाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:52 IST

महानगरपालिकेची महिला व बालकल्याण समिती आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नाशिक विभागीय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक महानगरपालिकेतील महिला नगरसेविकांना प्रत्यक्ष कामकाजाचे तसेच महापालिकेतील हक्क आणि कर्तव्यांबाबत धडे देण्यात आले. बुधवारी (दि.२८) झालेल्या या प्रशिक्षणाच्या उद्घाटनाच्या वेळी बोलताना महापौर रंजना भानसी यांनी महापालिकेच्या कामकाजासंदर्भातील प्रशिक्षणामुळे नगरसेवकांना कामकाज सुलभ होईलच शिवाय प्रभागात त्यांच्या कामकाजाचा ठसा उठविण्यास मदत होईल, असे सांगितले.

नाशिक : महानगरपालिकेची महिला व बालकल्याण समिती आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नाशिक विभागीय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक महानगरपालिकेतील महिला नगरसेविकांना प्रत्यक्ष कामकाजाचे तसेच महापालिकेतील हक्क आणि कर्तव्यांबाबत धडे देण्यात आले. बुधवारी (दि.२८) झालेल्या या प्रशिक्षणाच्या उद्घाटनाच्या वेळी बोलताना महापौर रंजना भानसी यांनी महापालिकेच्या कामकाजासंदर्भातील प्रशिक्षणामुळे नगरसेवकांना कामकाज सुलभ होईलच शिवाय प्रभागात त्यांच्या कामकाजाचा ठसा उठविण्यास मदत होईल, असे सांगितले.उंटवाडी रोडवरील द इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्सच्या सभागृहात आयोजित या प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, सभागृहनेते दिनकर पाटील, उपायुक्त हरिभाऊ फडोळ, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नाशिक विभागाचे विभागीय संचालक माधवराव शेजूळ व महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कावेरी घुगे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.कावेरी घुगे यांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून अवगत झालेले ज्ञान मनपात काम करताना उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. माधवराव शेजूळ यांनी प्रास्ताविक केले.  तर प्रकल्प अंमलबजावणी, कर आकारणी महापालिका नीतिशास्त्र याविषयी मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त नरेंद्र अष्टीकर यांनी मार्गदर्शन केले. राजकारणात व समाजकारणात महिलांचा सक्रि य सहभाग आणि जबाबदाऱ्या डॉ. स्नेहा पळनीटकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्र माचे संयोजन महिला व बालकल्याण समितीच्या प्रेमलता कदम यांनी केले. आभार उपायुक्त समाजकल्याण हरिभाऊ फडोळ यांनी मानले.मार्गदर्शनयावेळी महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील सर्व कलमे व नगरसेवकांची भूमिका व जबाबदाºया सभाशास्त्राचे नियम आणि सभागृहातील कामकाज, हरकतींच्या मुद्यांवर निर्णय देणे, सभेत प्रश्न, उपप्रश्न विचारण्याच्या तरतुदी याविषयी औरंगाबाद महानगरपालिकेचे माजी सचिव अ‍ॅड. एम. ए. पठाण, महानगरपालिकांचे अंदाजपत्रक व वित्तीय व्यवस्थापन, उत्पन्नाचे स्रोत वाढविणे व प्रकल्प अंमलबजावणी याविषयी बृहन्मुंबई महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक प्र. च. पिसोळकर यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक