कांद्याच्या ट्रॉलीखाली सापडून मजूर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:14 IST2020-02-07T23:45:17+5:302020-02-08T00:14:27+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात लिलावाचे कांदे ट्रॉलीमध्ये भरताना ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून एका मजुराचा मृत्यू झाला.

Workers found and killed under an onion trolley | कांद्याच्या ट्रॉलीखाली सापडून मजूर ठार

कांद्याच्या ट्रॉलीखाली सापडून मजूर ठार

येवला : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात लिलावाचे कांदे ट्रॉलीमध्ये भरताना ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून एका मजुराचा मृत्यू झाला.
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी (दि. ७) लिलावास सुरुवात झाली. दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान लिलाव झालेल्या ट्रॉलीमधील कांदे मजूर पुन्हा ट्रॉलीमध्ये भरत होते. दरम्यान चालकाचा अंदाज चुकल्याने व ट्रॅक्टर मागे आल्याने अनिस हरून पठाण (३५) रा.कौटखेडा या मजुराच्या डोक्यावरून ट्रॉलीचे चाक गेले. घटनेची माहिती कळताच अ‍ॅड. माणिकराव शिंदे, सचिव व्यापारे, बंडू शिंदे, व्यापारी संतोष अट्टल यांनी अनिसला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी ट्रॅक्टरमालक साईनाथ भाऊसाहेब चव्हाण हा पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला. शहर पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Workers found and killed under an onion trolley

टॅग्स :Accidentअपघात