ड्रीलबिट इंटरनॅशनल कंपनीतील कामगारांचा संप सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:18 IST2019-08-25T00:18:25+5:302019-08-25T00:18:44+5:30
येथील ड्रीलबिट इंटरनॅशनल कंपनीतील कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला अखिल भारतीय सीटूच्या सचिव व अंगणवाडी फेडरेशनच्या महासचिवांनी भेट देत कामगारांशी संवाद साधला आणि संपाला पाठिंबा दिला.

ड्रीलबिट इंटरनॅशनल कंपनीतील कामगारांचा संप सुरूच
सातपूर : येथील ड्रीलबिट इंटरनॅशनल कंपनीतील कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला अखिल भारतीय सीटूच्या सचिव व अंगणवाडी फेडरेशनच्या महासचिवांनी भेट देत कामगारांशी संवाद साधला आणि संपाला पाठिंबा दिला.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील ड्रीलबिट इंटरनॅशनल कंपनी व्यवस्थापनाने बेकायदेशीर कमी केलेल्या कामगाराना पूर्ववत कामावर घ्यावे, बेकायदेशीर वेतन कपात बंद करावी, कामगारांच्या पसंतीच्या युनियनशी बोलणी करावी यांसह विविध मागण्यांकरिता ६ आॅगस्टपासून संप पुकारला आहे. अखिल भारतीय सीटूच्या सचिव व अंगणवाडी फेडरेशनच्या महासचिव आर सिंधू व सीटूच्या राज्य सचिव शुभा शमीम, सीताराम ठोंबरे यांनी आंदोलनस्थळी जाऊन कामगारांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी कामगारांना मार्गदर्शन करत संपाला पाठिंबा दिला. यावेळी आंदोलनकर्त्या कामगारांनी पाठिंब्याचे स्वागत केले.