शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

बसने दिलेल्या धडकेत सातपूरला कामगार ठार

By admin | Updated: July 27, 2014 01:54 IST

बसने दिलेल्या धडकेत सातपूरला कामगार ठार

 

सातपूर : कारखान्यात रात्रपाळी करून घरी जाणाऱ्या कामगारांच्या दुचाकीला अज्ञात शहर वाहतूक शाखेच्या बसने पाठीमागून दिलेल्या धडकेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा कामगार जखमी झाला आहे़ या प्रकरणी सातपूर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे़सातपूर औद्योगिक वसाहतीतील इप्कॉस कंपनीतील कायम कामगार पांडुरंग कोंडाजी डगळे (२०, रा़ महिरावणी) व कंत्राटी कामगार राकेश ऊर्फ योगेश हरी ओतारी (२१, रा़ शिवाजीनगर) दोघेही रात्रपाळी करून दुचाकीने (क्रमांक एमएच १५, ईएल ८४७१) घरी जात होते़ शनिवारी सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास एबीबी कंपनीसमोर शहर वाहतूक बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली़ यात दुचाकीवर पाठीमागे बसलेले राकेश ओतारी हे बसखाली सापडल्याने जागीच ठार झाले, तर चालक पांडुरंग डगळे गंभीर जखमी झाले आहेत़ यानंतर घटनेची माहिती न देता बसचालक फरार झाला़ पांडुरंग डगळे हे कायम कामगार रात्रपाळी करून आपल्या दुचाकीने महिरावणीला जात असताना कंत्राटी कामगार राकेश ओतारी याने लिफ्ट मागितली व शिवाजीनगरपर्यंत सोडण्यास सांगितले़ त्यानुसार ओतारी दुचाकीवर पाठीमागे बसले आणि अर्ध्या रस्त्यातच त्यांच्यावर काळाने झडप घातली़ अपघाताचे वृत्त समजताच इप्कॉस कंपनी व्यवस्थापनाने तातडीने अ‍ॅम्ब्युलन्स पाठविली होती़ दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेले पांडुरंग डगळे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ या अपघात प्रकरणी सातपूर पोलिसांनी बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ए़ एम़ देशमुख करीत आहेत़ (वार्ताहर)