सुरत-शिर्डी महामार्गाचे काम अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 15:48 IST2020-02-26T15:48:23+5:302020-02-26T15:48:28+5:30

पिंपळगाव बसवंत : सुरत-शिर्डी महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून या रस्त्यावर खड्डे व धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे.तसेचनागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला  आहे.

 Work on the Surat-Shirdi highway is incomplete | सुरत-शिर्डी महामार्गाचे काम अपूर्ण

सुरत-शिर्डी महामार्गाचे काम अपूर्ण

ठळक मुद्दे निर्धारित कालावधीत काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी


रस्त्याच्या कडेने सुरू असलेल्या खाजगी कंपनीच्या लाईनचे काम देखील कोणतीही सुरिक्षतता नसल्याने राम भरोसे सुरू आहे रस्त्याला डिव्हायडर नसल्याने कधी छोटा मोठा अपघात घडू शकतो पण प्रशासनाच्या दुर्लक्ष पणामुळे बीनदास सुरू आहे.
सुरत शिर्डी राज्य महामार्ग रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून गेल्या िपिंपळगाव बसवंत परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको केला होता तरीही झोपलेल्या प्रशासनाला जाग आली नाही. फक्त ठेकेदाराने अधून मधून रस्त्यावर पाणी मारण्यास प्रारंभ केला. पण संथ गतीने सुरू असलेल्या रस्त्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होऊन धुळ व खड्ड्यापासू लवकर सुटका मिळेल का ?अशीविचारणाहोतआहे.

Web Title:  Work on the Surat-Shirdi highway is incomplete