पिंपळगाव बसवंत आगाराचे काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 01:22 IST2021-10-29T01:21:27+5:302021-10-29T01:22:03+5:30
राज्यव्यापी संपात पिंपळगाव बस आगारातील २२५ एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करीत उपोषण सुरू केले आहे. मागण्या जोपर्यंत मंजूर केल्या जात नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही. आंदोलनामुळे डेपोचे कामकाज ठप्प झाले असून, मोठ्या संख्येने बसेस आगारात उभ्या आहेत. आंदोलनाचा फटका प्रवासी वर्गाला बसला आहे.

पिंपळगाव बसवंत आगाराचे काम ठप्प
पिंपळगाव बसवंत : राज्यव्यापी संपात पिंपळगाव बस आगारातील २२५ एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करीत उपोषण सुरू केले आहे. मागण्या जोपर्यंत मंजूर केल्या जात नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही. आंदोलनामुळे डेपोचे कामकाज ठप्प झाले असून, मोठ्या संख्येने बसेस आगारात उभ्या आहेत. आंदोलनाचा फटका प्रवासी वर्गाला बसला आहे.
पिंपळगाव बसवंत हे शहर दळणवळणाच्या दृष्टीने मध्यवर्ती केंद्र आहे. तसेच व्यापारी शहर असून त्यामुळे बस आगारातून रोज शेकडो बसेस चालविल्या जातात. या बसेस पिंपळगावच्या आसपासच्या परिसर आणि पुणे, नाशिक, धुळे, मुंबई, सटाणा, मनमाड, नगर, आदी मार्गांवर चालविल्या जातात. मध्यरात्रीपासून डेपोतील वाहक, चालक आणि कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनाला पिंपळगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला आहे.
----------------------
एस.टी. सर्वसामान्य प्रवाशांची जशी जीवनवाहिनी तशी आमचीही आहे. त्यामुळे प्रशासनाने आमच्याबाबत देखील विचार करावा आणि आमच्या मागण्या कराव्यात. अन्यथा जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे बेमुदत उपोषण सुरू असणार आहे. शासनाने वेळेत दखल घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात.
- संदीप कुयटे, एसटी कामगार संघटना
........
एसटी कर्मचाऱ्यांनी जे उपोषण पुकारले आहे. त्यामुळे पिंपळगाव बसवंत आगाराचे नुकसान झाले आहे. दिवसाला चार ते पाच लाख रुपये गमावून जर हे उपोषण असेच सुरू राहिले तर हा आकडा कोट्यवधी रुपयांचा होऊ शकतो.
- विजय निकम, आगार व्यवस्थापक, पिंपळगाव बसवंत