गोंदेगावला बंधाऱ्यांचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 01:03 IST2019-04-12T01:03:26+5:302019-04-12T01:03:43+5:30

लासलगांव : जलयुक्त शिवार अभियानातून गोंदेगाव शिवारात सीमेंट बंधाºयाचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र सदर बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून या बांधकामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रामा भोसले, युवराज रनशूर, योगेश भोसले व गावकºयांनी केली आहे.

The work of Gondagao Bamboo is inconvenient | गोंदेगावला बंधाऱ्यांचे काम निकृष्ट

गोंदेगावला बंधाऱ्यांचे काम निकृष्ट

ठळक मुद्देआरोप : बांधकामाची चौकशी करण्याची गावकऱ्यांकडून मागणी

लासलगांव : जलयुक्त शिवार अभियानातून गोंदेगाव शिवारात सीमेंट बंधाºयाचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र सदर बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून या बांधकामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रामा भोसले, युवराज रनशूर, योगेश भोसले व गावकºयांनी केली आहे.
निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथील शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शेतशिवारात असलेल्या नाल्यावर जलयुक्त शिवार अभियानातून यात नवीन आणि दुरु स्ती असे ८ बंधारा मंजूर करण्यात आले आहे. निकृष्ट कामामुळे बंधाºयांना आताच तडे पडलेले आहे त्यामुळे शासनाच्ये लाखो रु पये पाण्यात जात आहे.
गोंदेगाव येथील नागरीक बंधारा परीसरात गेले असता बंधाºयाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आले. सिमेंटचा वापर कमी केला जात असल्याने केवळ रेती व गिट्टी बाहेर दिसत आहे. सिमेंटचा मसाला अत्यंत कमी प्रमाणात वापरला जात असल्याने बंधाºयासाठी वापरलेले लोखंड कमी एमएमचे वापरले असून बंधाºयाचे काम सुरु असताना संबधीत ठेकेदाराने एकदाहि पाणी मारले नसल्याचे गावकºयांचे म्हणने आहे .
शासन लाखो रूपये खर्चून जलस्त्रोत वाढविण्याकरीता प्रयत्न करीत असताना अशा प्रकारच्या निकृष्ट बंधाºयाने शासनाचे पैसे अनावश्यक खर्च होत आहेत. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. सद्य:स्थितीत सुरू असलेल्या बंधाºयाच्या बांधकामाचा दर्जा लक्षात घेतला तर पहील्या पाण्यातच बंधारा वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतक्या वर्षा नंतर हे जलयुक्त चे काम मंजूर झाले .मात्र लोभापोटी निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने सिंचन बंधारा मंजूर केला आहे.मात्र निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे शासनाचे लाखो रूपये पाण्यात जात आहे.त्यामुळे या कामाची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.येथील शिवारामध्ये ८ बंधाºयांचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असताना ग्रामपालिकेने पूर्णत्वचे दाखले दिले तरी कसे ? बंधाºयाचा सध्याचा दर्जा लक्षात घेतला तर यावर पाच लाख रु पये खर्च होतील की नाही, याबाबत शंका आहे. बंधाºयासाठी नाल्यातीलच मातीमिश्रीत गिट्टीवापरली जात आहे.
-रामा भोसले, ग्रामस्थ,गोंदेगाव
शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने सिंचन बंधारा मंजूर केला आहे. यासाठी जवळपास १५ लाख रु पये मंजूर करण्यात आले आहेत. ५ दिवसामध्ये या बंधाºयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.बांधकाम सुरु असताना १ दिवसही पाणी मारण्यात आलेले नाही. - योगेश भोसले, ग्रामस्थ,गोंदेगाव
निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत तक्र री आल्या आहेत. ज्या बंधाºयाचे काम दर्जाहीन झाले आहे त्याची तपासणी करु ण त्याचा अहवाल संबधितांकडे पाठविला जाईल. तसेच निकृष्ट दर्जाच्या बांधकाम असलेल्या बंधाºयाला पूर्णताचे दाखला दिलेला नाही.
-शुभांगी सुरसे, ग्रामसेवक, गोंदेगाव

Web Title: The work of Gondagao Bamboo is inconvenient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी