शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भगूर बसस्थानकाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:08 IST

भगूर बसस्थानकाचे काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांमधून एसटी महामंडळावर नाराजीचा सूर उमटत आहे.

देवळाली कॅम्प : भगूर बसस्थानकाचे काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांमधून एसटी महामंडळावर नाराजीचा सूर उमटत आहे.मागील वर्षी जुलै महिन्यात शिवसेनेचे युवराज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भगूर बसस्थानकाचे भूमिपूजन मोठ्या दिमाखात करण्यात आले होते. सदर बसस्थानकाचे काम नोव्हेंबर २०१८ रोजी पूर्ण होणार होते. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अंदाजे एक कोटी रुपये खर्च करून बसस्थानक बनविण्यात येत असले तरी गेले वर्षभर प्रवासीवर्ग मैदानावर उभे राहून बसचा प्रवास करण्यासाठी ऊन, वारा व पाऊस सहन करत आहे. बसस्थानकाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून अधिकारी वर्गच दुर्लक्ष करत असल्याने ४ आॅगस्ट रोजी होणारे उद्घाटन होणार का नाही? असाच प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. दररोज दोनशेपेक्षा जास्त बसेस येणाऱ्या स्थानकावर सध्या १०० बसेसही येत नसून पासधारक विद्यार्थी मात्र दोन हजारापेक्षा जास्त आहेत. भगूर ते शालिमार बसने ३० तर खासगी काळ्या-पिवळ्या गाडीने २५ रुपयांची आकारणी करण्यात येते. असे असून बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बसस्थानकाचे काम त्वरित करावे, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष तानाजी करंजकर, शिवसेनेचे श्याम ढगे, विक्रम सोनवणे, सचिन करंजकर, नारायण करंजकर, राष्टÑवादी कॉँग्रेसचे शिवाजी करंजकर, प्रताप करंजकर, कॉँग्रेसचे नगरसेवक मोहन करंजकर, शिवाजी गायकवाड आदींनी सर्व पक्षीयांच्या वतीने केली आहे.कामाचा वेग मंदावलाबसस्थानकाबाबत आमदार घोलप यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर काही काळ काम वेगात सुरू होते. पण गेल्या १५ दिवसांपासून कामाचा वेग अतिशय मंदावला असून ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ ब्रीदवाक्य घेऊन मिरवणारे अधिकार वर्ग भगूर बसस्थानकाच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे प्रवासी वर्गाकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :state transportएसटीNashikनाशिक