शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

ज्ञानवृद्धीचे काम सामाजिकदृष्ट्या मोलाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:04 AM

वाचकांना ज्ञानवृद्धीसाठी हवी ती पुस्तके उपलब्ध करून देण्याचे कार्य समाजाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाते. या अर्थाने हे कार्य सामाजिकदृष्ट्या मोलाचे आहे. गेल्या ७५ वर्षांपासून सिन्नर वाचनालयाचा सुरू असलेला ज्ञानयज्ञ पाहून आम्ही प्रभावित झालो. वाचनालयाकडे असलेली ग्रंथसंपदा वाचकांपर्यंत नीट पोहोचावी यासाठी पुस्तके ठेवण्याची अत्याधुनिक व्यवस्था गरजेची आहे. त्यासाठी कंपनीकडून वाचनालयास अडीच लाख रुपयांची देणगी देत असल्याचे प्रतिपादन माळेगाव येथील जिंदाल सिमलेस अ‍ॅण्ड बिझनेस सॉ लि. कंपनीचे प्रेसिडेंट दिनेशचंद्र सिन्हा यांनी केले.

ठळक मुद्देदिनेशचंद्र सिन्हा : सिन्नर वाचनालयास अडीच लाख रुपयांची देणगी

सिन्नर : वाचकांना ज्ञानवृद्धीसाठी हवी ती पुस्तके उपलब्ध करून देण्याचे कार्य समाजाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाते. या अर्थाने हे कार्य सामाजिकदृष्ट्या मोलाचे आहे. गेल्या ७५ वर्षांपासून सिन्नर वाचनालयाचा सुरू असलेला ज्ञानयज्ञ पाहून आम्ही प्रभावित झालो. वाचनालयाकडे असलेली ग्रंथसंपदा वाचकांपर्यंत नीट पोहोचावी यासाठी पुस्तके ठेवण्याची अत्याधुनिक व्यवस्था गरजेची आहे. त्यासाठी कंपनीकडून वाचनालयास अडीच लाख रुपयांची देणगी देत असल्याचे प्रतिपादन माळेगाव येथील जिंदाल सिमलेस अ‍ॅण्ड बिझनेस सॉ लि. कंपनीचे प्रेसिडेंट दिनेशचंद्र सिन्हा यांनी केले.सिन्हा यांनी वाचनालयातील विविध विभागांची पाहणी करून नानाविध उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली. त्याबद्दल समाधान व्यक्त केले.माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या सूचनेवरून आपण देणगी देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राजाभाऊ वाजे, वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, कार्यवाह हेमंत वाजे, उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे, नरेंद्र वैद्य व संचालक उपस्थित होते.अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनीही आधुनिकतेचा अंगीकार करून वाचकांची सेवा करण्यासाठी वाचनालय कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. भगत यांच्या हस्ते सिन्हा यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कंपनीचे एच. आर. विभागाचे प्रमुख, शशी सिन्हा व पर्चेस आॅफिसर राजेंद्र कहांडळ यांचाही सत्कार करण्यात आला. विलास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी चंद्रशेखर कोरडे, राजेंद्र देशपांडे, मनीष गुजराथी, जितेंद्र जगताप, निर्मल खिंवसरा आदी उपस्थित होते.इंटरनेटमुळे जग जवळ आले असून, पुस्तके वाचण्यापेक्षा नवी पिढी ई-पुस्तके वाचण्यास पसंती देत आहे. वाचनालयाने त्यादृष्टीने वाचकांना सोयी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन सिन्हा यांनी केले. त्यादृष्टीने आगामी काळात पावले टाकणार असल्याचे संचालक सागर गुजर यांनी सांगितले.

टॅग्स :libraryवाचनालय