शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘बॉर्डर’वरील जंगल संरक्षणासाठी महिला वनरक्षकांचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:53 IST

जंगलं सुरक्षित राहिली तर पृथ्वी टिकेल, त्यामुळे ‘जंगल वाचवा, वसुंधरा वाचवा’ अशी हाक दिली जाते. नाशिक पश्चिम वनविभागाच्या अखत्यारित हरसूल वनपरिक्षेत्रात गुजरात सीमेलगत असलेल्या आदिवासी भागात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला वनरक्षक येथील मौलिक वृक्षसंपदेच्या संरक्षणासाठी झटताना दिसून येत आहे.

ठळक मुद्देअतिसंवेदनशील वनपरिक्षेत्र : गुजरात सीमेजवळील वनक्षेत्रातील घुसखोरीवर करडी नजर

नाशिक : जंगलं सुरक्षित राहिली तर पृथ्वी टिकेल, त्यामुळे ‘जंगल वाचवा, वसुंधरा वाचवा’ अशी हाक दिली जाते. नाशिक पश्चिम वनविभागाच्या अखत्यारित हरसूल वनपरिक्षेत्रात गुजरात सीमेलगत असलेल्या आदिवासी भागात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला वनरक्षक येथील मौलिक वृक्षसंपदेच्या संरक्षणासाठी झटताना दिसून येत आहे. रात्रपाळीची गस्त असो किंवा तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी सापळे रचणे असो, अशा सर्वच कारवाईत महिला वनरक्षक अग्रेसर आहेत.नाशिक जिल्हा आदिवासी तालुक्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल वनपरिक्षेत्र असो अथवा पेठ तालुक्याचे वनपरिक्षेत्रात आदिवासी दुर्गम भाग मोठा आहे. यामधील बहुतांश भाग गुजरात राज्याच्या सीमेला लागूनच आहे. या भागातील साग, खैर, अर्जुनसादडा यासारख्या मौल्यवान वृक्षप्रजातीचे जंगल महाराष्टÑाच्या हद्दीत या भागात अस्तित्वात आहे. या जंगलांवर काही स्थानिकांच्या मदतीने गुजरातमधील तस्करांच्या टोळ्या घुसखोरीचा प्रयत्न करतात. मात्र त्यांचा हा प्रयत्न वनविभागातील सहा महिला वनरक्षकांचे पथक हाणून पाडत आहे.गुजरातला लागून असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील जंगल सुरक्षित ठेवण्यासाठी महिला वनरक्षक प्रयत्नशील आहेत. या भागात खैर, सागाची प्रजाती मोठ्या प्रमाणावर असून, गुजरात राज्याची सीमा अवघ्या पाच ते दहा किलोमीटर अंतरावर असल्याने तस्करी करणाऱ्या टोळ्या स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने शिरकाव होतो. महिला वनरक्षक जनप्रबोधन करत आपले ‘नेटवर्क’ बळकट करण्यावर भर देत आहेत.या गावांचा परिसर अतिसंवेदनशील४महाराष्टÑ-गुजरात सीमेला लागून असलेल्या हरसूल वनपरिक्षेत्रातील खडकओहोळ, ओझरखेड, देवडोंगरी-देवडोंगरा, बेरवळ, धायटीपाडा, वीराचा पाडा, चिंचओहोळ या आदिवासी गाव-पाड्यांचा परिसर अधिक संवेदनशील मानला जातो. या गावांच्या हद्दीत असलेल्या जंगलांमध्ये गुजरातकडून येणाºया तस्करांच्या टोळ्या काही स्थानिक आदिवासींना पैशांचे आमिष व अन्य प्रकारची प्रलोभने दाखवून त्यांच्या मदतीने जंगलात घुसखोरी करत वृक्षसंपदेवर रात्रीच्या सुमारास घाव घालतात.‘सीमा सुरक्षा’ बैठका नावालाच४नाशिक पूर्व-पश्चिम वनविभागाच्या हरसूल, सुरगाणा, उंबरठाण परिक्षेत्राची हद्द गुजरात सीमेला लागून आहे. यामुळे घुसखोरी रोखण्यासाठी गुजरात व नाशिक वनविभागाकडून सीमा सुरक्षेसाठी दरवर्षी संयुक्त बैठका घेतल्या जातात. मात्र सीमा सुरक्षेचा मुद्दा आजही ‘जैसे-थे’ आहे. तस्करांचा पाठलाग करताना अनेकदा गुजरात वनविभागाच्या वनरक्षकांकडून नाशिकच्या वनरक्षकांना आवश्यक तसा ‘बॅकअप’ पुरविला जात नाही, हेच वास्तव आहे.

टॅग्स :Nashikनाशिकforestजंगल