शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीत महिलांची भटकंती ; पश्चिम पट्ट्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:37 IST

तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत असून, शेतीसाठी पाणी तर नाहीच, जनावरांनाही पाणी नाही व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करायची वेळ गाव-वाडे-वस्त्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांवर आली आहे.

वणी : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत असून, शेतीसाठी पाणी तर नाहीच, जनावरांनाही पाणी नाही व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करायची वेळ गाव-वाडे-वस्त्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांवर आली आहे. देवसाणे, चौसाळे, चारणवाडी, सारसाळे, करंजखेड, एकलहरा, पिंगळवाडी, खोरी ही आदिवासी बहुल गावे असून, या व लगतच्या भागातील शेतजमिनीतील विहिरींनी तळ गाठला आहे.शेती व्यवसायावर याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. पुरेशा पाण्याअभावी शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. जनावरांना पिण्याचे पाणी कुठून उपलब्ध करायचे ही समस्या उभी ठाकली आहे. ग्रामस्थांनाही पिण्यासाठी पाणी मिळविण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागते आहे. सद्यस्थितीत एकलहरा व करंजाळी येथील धरणातून ग्रामपंचायतीच्या विहिरीच्या माध्यमातून पिण्यासाठी पाणीपुरवठा होत आहे; मात्र धरणसाठ्याची पाण्याची पातळी पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत देत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने विहिरी खोदण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वामनराव राऊत यांनी दिली.एक परस म्हणजेच सात फूट विहीर खोदण्यासाठी सुमारे पन्नास हजार रुपये खर्च येतो. काही भागात पाणी जमिनीत किती फुटावर लागू शकते याच्या चाचपणीसाठी अधिक खोदकामही करावे लागते. सदर खर्चाचा आवाका मोठा असल्याने आदिवासी बहुल ग्रामपंचायतींना हा खर्च पेलणारा नाही.जनावरांनाही पिण्यासाठी पाणी नसल्याने धरणालगतच्या क्षेत्रातील पाण्याचा वापर सध्या करावालागतो आहे. जनावरांना चारा नसल्याने गव्हाचा तुस व भाताचा कोंडा याचा वापर करावा लागतो आहे. हिरवा चारा दाट जंगली भागात असला तरी बिबट्या अस्वल, या जंगली श्वापदांच्या भीतीमुळे जनावरांना मोकळे सोडता येत नाही. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था आदिवासी बांधवांची झाली आहे.पशुपालक हवालदिलजनावरांना चारा-पाणी अत्यल्प असून, त्यांची भूक भागविण्यासाठी जंगलातही सोडता येत नसल्याने डोळ्यादेखत गुरांचे हाल पाहण्याची वेळ आदिवासी बांधवांवर आली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई ही या भागात पाचवीला पूजलेली, हा प्रतिवर्षीचा अनुभव आहे; मात्र ठोस उपाययोजनेअभावी आदिवासी भागाची परवड सुरूच असून, मागील वर्षी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने स्वत:च्या शेती व्यवसायासाठी पाणी वापरले नाही. ते पाणी जनतेसाठी टँकरच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून दिल्याची माहिती संगीता राऊत यांनी दिली. पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करणाºया ग्रामस्थांसाठीची समस्या सोडविणेकामी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईNashikनाशिक